रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

rat१७p१.jpg-ओळी ः
रत्नागिरी ः तालुक्यातील बसणी विकास सहकारी सोसायटीतर्फे अध्यक्ष कदम यांनी मयताच्या वारसाला मदत देताना.
-----
बसणी सोसायटीकडून
सभासदाच्या वारसाला मदत
रत्नागिरी ः तालुक्यातील बसणी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने मयत सभासदांच्या अंत्यविधी काळात त्याच्या वारसाला रोख रक्कम स्वरुपात मदत करणे हा उपक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे. यावर्षी मात्र संस्थेचा सभासद वारसाला यावर्षी वाढीव मदत करण्याचे नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या वार्षिक सभेत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वारसाला वाढीव मदत देण्यात आली. सोसायटीच्या या उपक्रमाचे बसणी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. संस्थेचे सभासद नथुराम पिलणकर यांच्या पत्नी व संस्थेच्या सभासद दिवंगत निकिता नथूराम पिलणकर यांचे नुकतेच निधन झाले. बसणी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत ५ हजाराच्या ठेवीत १ हजाराची मदत (अंत्यविधीसाठी) करण्याचा ठराव केला होता. त्या अनुषंगाने संस्थेचे अध्यक्ष जयवंत कदम यांनी मयत सभासदाच्या घरी जाऊन मयताचा वारस निशांत पिलणकर यांच्या अंत्यविधीसाठी एक हजार रुपयांचा मदत सोसायटीतर्फे करण्यात आली.
-------
श्रीराम मंदिर कट्टा उत्साहात
रत्नागिरी ः येथील श्रीराम मंदिर संस्थेने सुरु केलेल्या श्रीराम मंदिर कट्टा या उपक्रमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी एका विशेष कार्यक्रम झाला. यावेळी वयोपरत्वे ज्येष्ठ नागरिकांना जाणवणाऱ्या समस्या आणि त्यावर मात करण्यासाठी करावयाचे व्यायाम याविषयी प्रसिद्ध भौतिक उपचारतज्ज्ञ डॉ. दिलीप पाखरे यांनी मार्गदर्शन केले. आणि या वयात जाणवणाऱ्या प्रकृतीच्या तक्रारीविषयी या क्टावर सर्विस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अनिल सुर्वे यांनी स्वतः व्यायामाचे प्रकार करुन दाखवले. या कट्याला डॉ. पाखरे यांच्यासह सुरेश तथा अण्णा लिमये, मंगेश बेळेकर, एस. बी. खेडेकर, नित्यानंद दळवी, सुरेंद्र घुडे, शिवलकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यापुढील कट्टा १९ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता श्रीराम मंदिरात आयोजित करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले