रत्नागिरी- एकोप्याने काम केले तर भजनी कलाकार नक्कीच पुढे जाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- एकोप्याने काम केले तर भजनी कलाकार नक्कीच पुढे जाईल
रत्नागिरी- एकोप्याने काम केले तर भजनी कलाकार नक्कीच पुढे जाईल

रत्नागिरी- एकोप्याने काम केले तर भजनी कलाकार नक्कीच पुढे जाईल

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१७p२.jpg- KOP२२L५६८६९ रत्नागिरी : आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ या भजन मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संतोष शिर्सेकर. सोबत वासुदेव वाघे, साईनाथ नागवेकर आदी.
--------------
हेवेदावे विसरून संघटित व्हायला हवे
कोकणरत्न संतोष शिर्सेकर ; भजन मंडळाची सभा
रत्नागिरी, ता. १७ : सर्वांनी एकत्र यायला हवे, कलाकार मानधन हा विषयही एकोप्याने करायला हवा. त्यासाठी हेवेदावे विसरूनच संघटीत होऊन प्रयत्न व सातत्य असायला हवे. मंडळाने उत्कृष्ट काम करुन चांगले प्रयत्न सुरू केले आहेत. हे अभिमानास्पद आहे. आज महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. पुरूष कलाकारांनीही अशीच एकजूट दाखवायला हवी. संस्था खंबीरपणे सर्वांसाठी उभी आहे. फक्त आपण सर्वांनी विश्वास ठेवून वेळ द्यायला हवा, नक्कीच यश मिळेल, असे प्रतिपादन आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष, कोकणरत्न संतोष शिर्सेकर बुवा यांनी केले.

आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळ या भजन मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. पटवर्धन हायस्कूल येथे ही सभा झाली. शिर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. साईनाथ नागवेकर, शरद गोळपकर, एकनाथ पंड्ये, सर्वता चव्हाण, मिलींद आरेकर सुरेश शिंदे, सागर मायंगडे, निवास शिरगांवकर, सौ. शितल सकपाळ आदी उपस्थित होते. संस्था मोठी करायची असेल तर आपण योगदान द्यायला शिकलं पाहिजे असे उद्गगार शरद गोळपकर यांनी काढले. संस्था अनेक उद्दिष्टे समोर ठेवून काम करत आहे. भजनी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपणही एकत्र यायला शिकले पाहिजे, असे मत साईनाथ नागवेकर यांनी व्यक्त केले. सौ. प्रेरणा विलणकर, सौ. देसाई, सौ. राखी भोळे, सौ. आंबेरकर, सौ. स्नेहा शेट्ये, सौ. वेदा शेट्ये आदी महिला कार्यकर्त्यांचाही गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या सभेचे सूत्रसंचालन वासुदेव वाघे यांनी केले.