चिपळूण-चिपळूण नागरीने पतसंस्थेने सहकार रुजवला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-चिपळूण नागरीने पतसंस्थेने सहकार रुजवला
चिपळूण-चिपळूण नागरीने पतसंस्थेने सहकार रुजवला

चिपळूण-चिपळूण नागरीने पतसंस्थेने सहकार रुजवला

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१७p९.jpg-KOP२२L५६८७९ चिपळूण ः वर्धापदिनदिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सहकार आयुक्त अनिल कवडे.
-------------

चिपळूण नागरीने पतसंस्थेने सहकार रुजवला
अनिल कवडे ; वर्धापन दिनी एक हजार कोटी ठेव पूर्तीचा आनंद सोहळा
चिपळूण, ता. १७ ः सहकारात एकमेकास सहकार्याची भूमिका ठेवून विकासाता मुलमंत्र जपायला हवा. चिपळूणमधील चिपळूण नागरी पतसंस्था ५० शाखांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली, ही बाब कौतुकास्पद आहे. केवळ २९ वर्षांच्या कालावधीत १ हजार कोटी ठेवींचा टप्पा गाठतानाच चिपळूण नागरी सहकार रुजविण्यासाठी चांगले प्रयत्न करीत असून ते आदर्शवत आहे, असे प्रतिपादन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले.
चिपळूण नागरी पतसंस्थेचा ३० वा वर्धापन दिन व १ हजार कोटी ठेवी पूर्ततेचा आनंद सोहळा संस्थेच्या सहकार भवनातील सहकार सभागृहात झाला. या वेळी संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण व व्हा. चेअरमन सूर्यकांत खेतले यांनी स्वागत केले. सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणाले, चिपळूण नागरी पतसंस्थेने २९ वर्षांत १ हजार कोटी ठेवींचा टप्पा पार केल्याबद्दल पतसंस्थेचे कौतुक करावे तितकेच कमी आहे. संस्थेची ३० वर्षांची वाटचाल सोपी नाही. सहकारात काम करीत असताना तळागळातील लोकांचे पत निर्माण करण्याचे काम पतसंस्थेची जबाबदारी आहे. गरजू लोकांना अडचणींच्या वेळी कर्ज दिले की ते प्रामाणिकपणे फेडतात, हीच पद्धत संस्थेने जोपासली. संस्था ठेवीदारांसह कर्जदाराना प्रशिक्षण देते, ही महत्त्वाची बाब आहे. संस्थेने क्युआर कोड पद्धत अंमलात आणली पाहिजे. यातून संस्थेचा आर्थिक व्यवहार वाढण्यास मदत होईल. बँकांमधील ठेवींना संरक्षण मिळते तसे पतसंस्थामधील ठेवींना संरक्षण मिळाले पाहिजे. सीबिल रेटींग संदर्भात केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. सहकार हे मोठे व्यासपीठ आहे. यातून लोकांची सेवा करता येवू शकते.
संस्थापक अध्यक्ष चव्हाण यांनी पतसंस्थेच्या कामाचा आढावा घेतला. पुढील पाच वर्षाच्या संकल्पित आराखड्याची वाटचाल यशस्वी करायची आहे. यामध्ये आपण सर्वजण योगदान द्याल. सहकारात लोकशिक्षणाची गरज आहे. लोकांचा सहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे, असे सुभाषराव चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी एक हजार कोटी ठेवींच्या पूर्ततेत योगदान देणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांचा व शाखाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.