दिव्यांग व्यक्ती, निराधारांना नीलेश राणेंची ‘दिवाळी भेट’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांग व्यक्ती, निराधारांना
नीलेश राणेंची ‘दिवाळी भेट’
दिव्यांग व्यक्ती, निराधारांना नीलेश राणेंची ‘दिवाळी भेट’

दिव्यांग व्यक्ती, निराधारांना नीलेश राणेंची ‘दिवाळी भेट’

sakal_logo
By

56897
वराड ः दिव्यांग, निराधारांना दिवाळी भेट देताना नीलेश राणे. सोबत संतोष साटविलकर, राजन माणगावकर आदी.

दिव्यांग व्यक्ती, निराधारांना
नीलेश राणेंची ‘दिवाळी भेट’

वराड ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम

मालवण, ता. १६ : वराड गावातील श्रावणबाळ वृद्धापकाळ, अपंग आणि निराधार व्यक्तींना भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्यातर्फे वस्तू स्वरुपात ‘दिवाळी भेट’ वितरण काल केले.
सर्वसामान्य कुटुंबीयांच्या घरातील दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या हेतूने वराड भाजप शक्तिकेंद्र प्रमुख राजन माणगावकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ९५ व्यक्तींना दिवाळी भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. वराड ग्रामपंचायत येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषद माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच सीताराम मिठबावकर, माजी सभापती अजिंक्य पाताडे, वराड पंचायत समिती शक्तिकेंद्र प्रमुख माणगावकर, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष हडकर, गाव कमिटी अध्यक्ष बबन पांचाळ, माधुरी मसुरकर, रसिका माणगावकर, बूथ कमिटी अध्यक्ष अजय चव्हाण, हनुमान सरमळकर, मोहन मसुरकर, दादा नाईक, चंद्रशेखर वराडकर, दत्ताराम परब आदी उपस्थित होते. वराडमधील गेल्या काही वर्षांत रस्ते, जोडरस्ते, तलाव, पूल आदी प्रश्न प्रलंबित राहिले. हे प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून प्राधान्याने सोडवावेत, अशी मागणी स्थानिकांनी राणेंकडे केली. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून रखडलेला विकास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा ग्वाही राणे यांनी वराडवासीयांना दिली.