बाजारादिनी चिरे वाहतुकीस विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारादिनी चिरे वाहतुकीस विरोध
बाजारादिनी चिरे वाहतुकीस विरोध

बाजारादिनी चिरे वाहतुकीस विरोध

sakal_logo
By

56913
नांदगाव ः आठवडा बाजारादिवशी असे ट्रक बाजारातून जात असल्याने होणारी वाहतूक कोंडी.


बाजारादिनी चिरे वाहतुकीस विरोध

नांदगाववासीयांची भूमिका; अरुंद रस्त्यामुळे अडचणी, वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग

सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १७ ः नांदगाव-फोंडाघाट मार्गावरुन कोल्हापूरला होणारी चिरेवाहतूक दर रविवारी येथील आठवडा बाजारादिवशी सकाळच्या सत्रात बंद ठेवावी. कारण हा मार्ग अरुंद आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिक, वाहनचालक व व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे‌. बाजारादिवशी लहान मुलेही याठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्याने अपघाताची शक्यता आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये अनेक वेळा वादही निर्माण झाले आहेत. यासाठी संबंधित विभागाने यावर तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
नांदगाव तिठा हे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने परिसरातील १० ते १२ गावातील नागरिकांना नांदगाव तिठा हा आठवडा बाजार सोयीचा ठरतो. त्यामुळे रविवारच्या दिवशी नांदगाव तिठा येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. यावेळी या मार्गावरुन ट्रक कोल्हापूरकडे चिरेवाहतुक करतात. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद होऊन वाहतूक कोंडी होते. याचा फटका बाजारासाठी आलेल्या नागरिकांसह व्यापाऱ्यांसह अनेकजणांना त्रास सहन करावा लागतो. महामार्ग चौपदरीकरणावेळी पुर्वीची बाजारपेठ भरत असलेली जागा गेल्याने तसेच इतर ठिकाणी पक्के गाळे झाल्याने आठवडा बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना जागा कमी पडत आहेत. त्यातच वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे व्यवसाय करताना अनेक अडचणी येत आहेत.
----------
चौकट
बाजारपेठ मासळीसाठी प्रसिद्ध
नांदगाव तिठा ही आठवडा बाजारपेठ ताजी आणि सुकी अशा दोन्ही प्रकारच्या मासळीसाठी प्रसिध्द आहे. मिठबांव, देवगड, मालवण, विजयदुर्ग अशा जिल्ह्यातील सर्वच बंदरावरील मच्छी मिळण्याचे हे प्रसिद्ध ठिकाण असल्याने असंख्य ग्राहकांबरोबर हॉटेल व्यावसायिकही या ठिकाणी ताजी मच्छी खरेदीसाठी गर्दी करतात. जर रविवारच्या दिवशी ही वाहतूक अशीच राहिल्यास याही व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
-----------
कोट
57047
नांदगाव आठवडा बाजारादिवशी कोल्हापूरला होणाऱ्या चिरे वाहतुकीच्या अवजड वाहनांमुळे नागरिक व व्यापारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे. जर संबंधित विभागाने वेळीच दखल घेतली नाही तर ती वाहतूक आम्हीच बंद करू.
- हेमंत परुळेकर, सरपंच, ओटव
------------
कोट
56898
नांदगाव आठवडा बाजारादिवशी परिसरातील गावातून अनेक ग्राहक याठिकाणी येत असतात. अशा वेळी होणाऱ्या या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- आफ्रोजा नावलेकर, सरपंच, नांदगाव
------------
कोट
56926
नांदगाव आठवडा बाजारादिवशी कोल्हापुरात होणाऱ्या अवजड वाहनांच्या चिरे वाहतुकीमुळे ग्राहक व व्यापारी वर्गाला मोठा फटका बसत आहे. शिवाय‌ वाहनचालक व नागरिकांमध्ये वाद निर्माण होतात. अपघाताची शक्यता आहे. तरी आठवडा बाजारादिवशी सकाळच्या सत्रात ही वाहतूक बंद ठेवावी, अन्यथा कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका.
- पंढरी वायंगणकर, सरपंच तथा व्यापारी संघटना अध्यक्ष, असलदे