''राष्ट्रवादी''तर्फे मळगावात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''राष्ट्रवादी''तर्फे मळगावात 
क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
''राष्ट्रवादी''तर्फे मळगावात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

''राष्ट्रवादी''तर्फे मळगावात क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

sakal_logo
By

56902

swt1714.jpg मध्ये फोटो आहे.


‘राष्ट्रवादी’तर्फे मळगावात
क्रिकेट स्पर्धेचे उद्‍घाटन
सावंतवाडी, ता. १७ ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषक २०२२ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागात ही स्पर्धा होणार असून २४ क्रिकेट सामने आयोजिले आहेत. मळगाव येथे पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला, अशी माहिती कोकण महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी दिली.
स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा सामना मळगाव आणि करिवडे संघात झाला. या स्पर्धेसाठी सोळा संघांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या क्रिकेट सामन्यांबरोबरच पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. संघटना बळकटीसाठी सभासद नोंदणी देखील करण्यात येत असून त्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत रिंगणात असेल, असे घारे-परब यांनी सांगितले. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काका कुडाळकर, प्रफुल्ल सुद्रिक, अनंत पिळणकर, रेवती राणे, दर्शना देसाई, पुंडलिक दळवी आणि पदाधिकारी उपस्थित होते.