चिपळूण-डीबीजेतील निबंध स्पर्धेत सायली कुळे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-डीबीजेतील निबंध स्पर्धेत सायली कुळे प्रथम
चिपळूण-डीबीजेतील निबंध स्पर्धेत सायली कुळे प्रथम

चिपळूण-डीबीजेतील निबंध स्पर्धेत सायली कुळे प्रथम

sakal_logo
By

फोटो ओळी
ratchl171.jpg- KOP22L56935
चिपळूण ः सायली कुळेचा हिचा गौरव करताना सानिका शिंदे.
-----------
डीबीजेतील निबंध स्पर्धेत सायली कुळे प्रथम
चिपळूण, ता. १७ ः येथील डीबीजे महाविद्यालयातील वाणिज्य विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एफवाय बीकॉममधील सायली संदीप कुळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिने शिवरायांचे गड किल्ले आणि त्यांचे संवर्धन विषयी लेखन केले.
महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या माध्यमातून निबंध स्पर्धेचे आयोजन करून प्रत्येक विद्यार्थ्याला विषय निवडण्याची मुभा दिली होती. निवडलेल्या विषयावरती तर्कशुद्ध निबंध लिहण्याची सूचना करण्यात आली होती. यामध्ये सर्व मुलांनी सहभाग नोंदवला होता. प्रत्येकाने आपापल्या परीने विषय निवडत निबंध लिहिले होते. यातूनच शिवरायांचे गड किल्ले व त्यांचे संवर्धन या विषयावर सायली कुळे हिने निबंध लिहीला होता. तिच्या या निबंधाचे परीक्षण केल्यानंतर या स्पर्धेत तिचा प्रथम क्रमांक आला. प्रमाणपत्र, मेडल देऊन सानिका शिंदे यांनी तिचा गौरव केला. त्याचबरोबर श्वेता गजमल हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तिने कोरोना काळातील दिवस या विषयावर निबंध लिहिला होता. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षीस देऊन त्यांना गौरविण्यात आले.