चिपळूण-अध्यक्षपदी डॉ. राकेश चाळके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-अध्यक्षपदी डॉ. राकेश चाळके
चिपळूण-अध्यक्षपदी डॉ. राकेश चाळके

चिपळूण-अध्यक्षपदी डॉ. राकेश चाळके

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१७p२६.jpg- P22L56934 डॉ. राकेश चाळके
-ratchl१७३.jpg-P22L56922 डॉ. ह्रषिकेश चितळे


चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स संघटनेच्या
अध्यक्षपदी डॉ. राकेश चाळके
चिपळूण, ता. १७ ः चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या २०२२-२०२३ साठी नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा पुष्कर हॉटेल पेंढाबे येथे झाला. असोसिएशनच्या अध्यक्षपदी सती येथील डॉ. राकेश चाळके, लोटे येथील डॉ. हृषिकेश चितळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच रामपूर येथील डॉ. संतोष पाटील यांची सेक्रेटरीपदी, चिपळूण येथील सुप्रसिद्ध डेंटल सर्जन डॉ. चेतन पाटील यांची खजिनदारपदी वर्णी लागली. महिला प्रतिनिधी म्हणून डॉ. सुविधा बैल्लारीकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी पुढील वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी व्हिजन ठेवून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अध्यक्ष चाळके डॉ. राकेश चाळके यांनी डॉक्टरांचे दवाखाने, हॉस्पिटल कर्मचारी यांच्या असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. डॉ. ऋषिकेश चितळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवा समाजातील सर्वसामान्य घटकापर्यंत पोहचवून आरोग्यमान उंचावण्यासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ. संतोष पाटील यांनी संघटना मजबूत करण्यावर भर दिला. सर्व पदाधिकारी व सदस्यांमध्ये समन्वय साधून सर्व समावेशक व सर्वांना संधी देऊन काम करण्यावर भर दिला जाईल. त्याशिवाय डॉक्टर व त्यांचे कुटुंबीयांचा आरोग्य विमा, डॉक्टरांसाठी पतपेढी व संघटनेची स्वतःची इमारत उभारण्यावर प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. महिला प्रतिनिधी डॉ. सुविधा बेल्लारीकर यांनी बाल व महिला आरोग्यांवर काम करणार असल्याचे सांगितले. मावळते अध्यक्ष डॉ. अरुण पाटील, डॉ. कृष्णकांत पाटील, डॉ. अजित दाभोलकर, डॉ. नीलेश पाटील, डॉ. विशाल पेटकर, डॉ. मंगेश वाझे, डॉ. विखारे, डॉ. पांडुरंग पाटील, डॉ. अमित बिडकर, डॉ. विनोद फडतरे, डॉ. प्रसाद खातू, डॉ. प्रसाद दळी, डॉ. नियाज पाते, डॉ. खेडेकर, डॉ. नितीन पाटील, डॉ. पराग यादव, डॉ. दुधाळ, डॉ. कलगुटगी, डॉ. खानविलकर आदी १०० हून अधिक डॉक्टरर्स उपस्थित होते.