लांजा-वीज पडून घराला भगदाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-वीज पडून घराला भगदाड
लांजा-वीज पडून घराला भगदाड

लांजा-वीज पडून घराला भगदाड

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१७p१९.jpg-KOP२२L५६९०७ लांजा ः वसंत कदम यांच्या घरावर वीज पडून भिंतीला पडलेले भगदाड.
----------

वीज पडून घराला भगदाड

बेनी खुर्दमधील घटना ; आई, मुलगा बचावला
लांजा, ता. १७ ः प्रचंड कडकडाट करत वीज घरावर कोसळण्याची घटना लांजा तालुक्यातील बेनी खुर्द येथे रविवारी (ता. १६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने घरात असलेली मायलेकरे बालंबाल बचावली. रविवारी सायंकाळी पाचनंतर विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्याने बेनी खुर्द येथील वसंत कदम यांच्या घरावर वीज पडली. यावेळी वसंत कदम यांची पत्नी आणि मुलगा घराच्या पडवीमध्ये गप्पा मारत बसले होते. ही वीज घराच्या पुढील दरवाजाने आत शिरून भिंतीला भगदाड पाडून बाहेर पडली. या घटनेत कदम यांच्या घरातील विद्युत मीटर आणि इतर सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून कदम यांच्या पत्नी आणि मुलाला कोणतीही दुखापत झाली नाही.