रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

-rat16p13.jpg- KOP22L56951
रत्नागिरी : कुवारबाव येथील स्वरूपानंद ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिनी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना अभिवादन करताना श्रीकांत पाटील, विनायक हातखंबकर, प्रताप सावंतदेसाई आदी.
--------
स्वरूपानंद ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन
रत्नागिरी : कुवारबाव येथील स्वरूपानंद ग्रंथालयाच्या वतीने उत्कर्षनगर प्राथमिक शाळेत वाचन प्रेरणादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिवंगत राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन, ग्रंथदिंडी सोहळा, वाचक सभासद पुरस्कार, निबंध लेखन पुरस्कार, शाळेला पुस्तक भेट याचे आयोजन केले. या प्रसंगी माजी प्राचार्य प्रा. प्रताप सावंतदेसाई यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राची माहिती मुलांना दिली. ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष विनायक हातखंबकर यांनी अग्नीपंख पुस्तकातील एक उतारा आदर्श वाचन म्हणून मुलांना वाचून दाखविला. ग्रंथालयाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका सौ. खानविलकर यांनी स्वागत केले. शिक्षिका सौ. इंदूलकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी सदस्य उमेश राऊत, वारंग, काळोखे, दिलीप रेडकर, प्रज्ञा रामाणे, कळंबटे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.
-----------

फोटो ओळी
-rat16p3.jpg-
KOP22L56954 पावस : अनसुया आनंदी वृद्धाश्रमाला शिधा वाटप करताना अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे पदाधिकारी.
----------
अनसुया वृद्धामाला चित्पावन मंडळातर्फे शिधा

पावस : येथील अनसुया आनंदी वृद्धाश्रमाला रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने सामाजिक भान जपत शिधा वाटप केले. एक महिना कालावधीचे लागणारे धान्य येथील वृद्धाश्रमाकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, सदस्य अविनाश काळे, अनंत आगाशे, शेखर लेले, ल. वि. केळकर वसतीगृहाचे व्यवस्थापक रविकांत शहाणे, मोहन पटवर्धन यांच्यासमवेत आश्रमाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. या आश्रमाची स्थापना कै. सौ. मंगला सोमणी यांनी केली होती. त्यांच्या पश्चात हा आश्रम चांगल्या स्वरूपात सुरू आहे. तसेच समाजातील दानशूर मंडळी येथे मदत करत आहेत.
----------