चिपळूण-समन्वयक म्हणून शहानवाज शहांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-समन्वयक म्हणून शहानवाज शहांची निवड
चिपळूण-समन्वयक म्हणून शहानवाज शहांची निवड

चिपळूण-समन्वयक म्हणून शहानवाज शहांची निवड

sakal_logo
By

rat16p26.pg
56952
शहानवाज शहा
-------
वाशिष्ठी, जगबुडीच्या अभ्यासात
शहानवाज शहा समन्वयक
चिपळूण, ता. १६ः येथील जलदूत व नाम फाउंडेशनचे तांत्रिक सल्लागार शहानवाज शहा यांची चिपळूणमधील वाशिष्ठी व खेडमधील जगबुडी नदीच्या अभ्यासासाठी समन्वयक म्हणून निवड झाली आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत चला जाणूया नदीला या अभियानासाठी जिल्हा समितीवर जलदूत शहा यांची निवड झाली आहे.
गेल्या काही वर्षात कधी कमी, तर कधी अतिवृष्टी होत आहे. परिणामी पूर आणि दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो. वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. प्रदूषणासारख्या वाढत्या समस्यांमुळे उपलब्ध भूपृष्ठजलाची उपयुक्तता घटत आहे. नद्यांमध्ये, जलाशयामध्ये आलेल्या गाळामुळे त्यांची वहन क्षमता, साठवण क्षमता कमी झाली आहे. याचा विचार करता नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्यांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. चला जाणूया नदीला या अभियानाखाली नदी संवाद यात्रेची सुरवात सेवाग्राम वर्धा येथून झाली आहे. याबाबत महिती देताना समन्वयक शहानवाज शाह म्हणाले, मी फक्त वाशिष्ठी व जगबुडी नदीचा शासन व जनता यामधील दुवा आहे, समन्वयक आहे. शासनाने ही फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. या दोन्ही नदी व त्यांच्या उपनद्यांचा सखोल सर्वांगीणदृष्ट्या अभ्यास, माहिती गोळा करणे व जनजागृती करून परिक्रमा करणे असे कामाचे व्यापक स्वरूप आहे. हे काम फार मोठे आहे. चिपळूण, खेड, दापोली, गुहागर या चार तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, जलप्रेमी, निसर्ग प्रेमी, सर्व अधिकारी, प्रशासन, महाविद्यालये, विद्यालये, शाळा, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांना सोबत घेऊन करायचे आहे. शासनाने दिलेली जबाबदारी पूर्णपणे सांभाळण्याचा व या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे.