लांजा-काजळी नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-काजळी नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसले
लांजा-काजळी नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसले

लांजा-काजळी नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसले

sakal_logo
By

फोटो ओNr
-rat१७p२०.jpg-KOP२२L५६९१४ लांजा ः तुफानी पावसामुळे येथील काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट येथील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले.
-rat१७p२१.jpg-OP२२L५६९१५ तयार झालेले भात पीक पुराच्या पाण्याने आडवे झाल्याने नुकसान झाले आहे.
----------

काजळी नदीच्या पुराचे पाणी शेतात घुसले

लांज्यात तुफान पाऊस ; पालू गावाला फटका, शेतकऱ्यांचे नुकसान

लांजा, ता. १७ ः विजांच्या कडकडाटासह रविवारी (ता. १६) सायंकाळी कोसळलेल्या तुफान पावसाचा फटका हा पालू गावाला बसला आहे. पावसामुळे काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी येथील भातशेतीत घुसून शेतकऱ्यांचे भातशेतीचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने लांजा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. तयार झालेली भात पिके शेतातच उभी आहेत. पावसामुळे भात पीक कापायचे कसे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रविवारी सायंकाळी तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस कोसळला. सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या दरम्याने कोसळलेल्या तुफानी पावसाने येथील काजळी नदीला पूर आला. पुराचे पाणी थेट येथील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. त्यामुळे तयार झालेले भात पीक हे पूर्णपणे पुराच्या पाण्याने आडवे झाले आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस सायंकाळी सहा वाजेपर्यंत जोरदारपणे कोसळत होता. नदीच्या पुराच्या पाण्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्‍यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
-----