मंडणगड - घराडी सरपंचपदी सुलभा चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड - घराडी सरपंचपदी सुलभा चव्हाण
मंडणगड - घराडी सरपंचपदी सुलभा चव्हाण

मंडणगड - घराडी सरपंचपदी सुलभा चव्हाण

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१७p२२.jpg-KOP22L56918 मंडणगड : निवडणूक निकालानंतर तहसील कार्यालयासमोर जल्लोष करताना बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते व विजयी उमेदवार.
-rat१७p२३.jpg- KOP22L56919 मंडणगड ः शहरातील मुख्य चौकात विजयी उमेदवार आणि आमदार योगेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
---------------

मंडणगडमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व प्रस्थापित
घराडी सरपंचपदी सुलभा चव्हाण ; निगडी सरपंचपदी सईदा कोंडेकर, महविकास आघाडीला धक्का
मंडणगड, ता. १७ ः तालुक्यातील प्रतिष्ठेच्या असणाऱ्या दोन ग्रामपंचायतींवर आमदार योगेश कदम यांचे वर्चस्व असल्याचे निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले. घराडी ग्रुप ग्रामपचायतींच्या सरपंचपदी सुलभा प्रमोद चव्हाण, तर निगडी ग्रामपंचायतीचे सरपंचपदी सईदा मुराद कोंडेकर लोकनियुक्त थेट सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. दोन्ही ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटाने आपला दावा केला आहे.
तालुक्यातील घराडी व निगडी या दोन ग्रुप ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. निकालानंतर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणात शिंदे गटाच्या उदयाची साक्ष मिळाली. शिवसेना व राष्ट्रवादी या तालुक्यातील क्रमांक एक व दोनचे पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना समोरे गेलेले असतानाही घराडी व निगडी या दोन्ही ग्रामपंचायतीवर एकट्याने लढणाऱ्या आमदार योगेश कदम यांच्या शिंदे गटाचेच सरपंच निवडून आले. निगडी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने पूर्णपणे वर्चस्व राखले. सरपंच व सदस्य अशा दोन्ही आघाड्यावर शिंदे गटाचा वरचष्मा राहीला, तर घराडी ग्रामपंचायतीचाही थेट सरपंच शिंदे गटाचा निवडून आला आहे. ४ सदस्य आघाडीचे व ३ सदस्य शिंदे गटाचे निवडून आल्याचा दावा बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर यांनी निवडणूक निकालानंतर केला.
मतमोजणी प्रक्रिया शांततेत होण्यासाठी तहसील कार्यालयाचे आवारात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक अधिकारी म्हणून पवन गोसावी, किरण पवार यांनी काम पाहिले.
घराडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडीत सुलभा प्रमोद चव्हाण (५१० मते) यांनी समिक्षा सुनील सावंत यांना (४२०) यांचा पराभव केला. प्रभाग १ मधून अनिषा अनिल फणसे (१४८ मते), मयुरी मिलिंद मोरे (१५५), गणेश धनराज बारस्कर (१३८) विजयी झाले. प्रभाग दोनमधून (नारगोली) दशरथ मधुकर साळुंखे, दर्शना दगडू साळुंखे, सुशिल महादेव वजीरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग तीन (घराडी) मधून सविता संतोष बैकर (२१७), माधवी महादेव सुखदरे (२०२) मते मिळवून विजयी झाल्या. प्रज्ञा प्रकाश जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
निगडी ग्रुप ग्रामपंचायतीत सरपंच निवडणुकीत सईदा मुराद कोंडेकर (४५७ मते) यांनी महेफूजा मिनार कोंडकर (३१९) आणि अनिता अनिल साखरे (५) यांचा पराभव केला. निगडी प्रभाग एकमधून सचिन यशवंत सावंत (१२९), अस्मा सुऐब चिपोलकर (१४४) विजयी झाले. प्रभाग दोनमधून अशोक अर्जुन पवार (१३५), गजाला नजिर कोंडकर (१५२), संजना संदेश साखरे (१३६), प्रभाग तीनमधून कामरुन्निसा महमुद ओंबीलकर (१६६), रुपेश गजानन निगुडकर (१५८) विजयी झाले.