सहकारी संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात
सहकारी संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात

सहकारी संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात

sakal_logo
By

सहकारी संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात

कणकवली तालुका; विविध संस्था, पतसंस्थांचा समावेश

तुषार सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १७ ः तालुक्यातील शेती विकास संस्था, औद्योगिक संस्था, पतसंस्था, पाणी वापर संस्था, मजूर संस्था तसेच ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत; मात्र गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. याही निवडणुका लवकरच घेतल्या जाणार असून तशी तयारी सुरू आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सहकारी संस्थांच्या निवडणुका गेली दोन वर्षे पुढे ढकलण्यात आल्या. तालुक्यातील ३८ शेती विकास सेवा संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या आहेत. आता ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील विविध प्रकारच्या संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. ही प्रक्रिया मध्यंतरी थांबविली होती. या निवडणूक प्रक्रियेवरील स्थगिती उठवल्यानंतर आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांची पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये तालुक्यातील ३३ मजूर सहकारी संस्थांमधील ११ संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. १६ पतसंस्थांपैकी ४ संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेती प्रक्रिया संस्थेतील एका संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पणन विभागातील ४ पैकी ३ संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू केली आहे; मात्र, गृहनिर्माण सहकारी संस्था जवळपास १२० असून यातील ७० संस्थांच्या निवडणुका अजूनही झालेल्या नाहीत. या निवडणुका तातडीने राबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मध्यंतरी गाजली होती. त्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली होती. ही स्थगिती राज्य शासनाने एक ऑक्टोबरपासून उठवली आहे. त्यामुळे या महिन्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. खरेदी-विक्री संघासोबतच, मजूर, पाणी वापर संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रिया आता राबविल्या जात आहेत. ज्या संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि त्यांच्या सभासद मतदार यादीला अंतिम मंजुरी दिली होती. अशा संस्थाचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. ज्या संस्थांच्या मुदती संपल्या आहेत, अशा संस्थाच्या निवडणुकीचा नव्याने कार्यक्रम जाहीर होणार आहेत.
-----
कोट
कणकवली तालुक्यातील १२० गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत आहेत. या संस्थांच्या निवडणुका विविध कारणांनी पुढे ढकलल्या होत्या. आता या निवडणुका घेण्यात येणार आहेत. संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींकडून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. गृहनिर्णाच्या काही संस्थाच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. आता निवडणूकीस पात्र असलेल्या गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूका घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी शासनाने निवडणूक अधिकाऱ्यांचे पथक निश्चित केले आहे. गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींना संस्थाच्या निवडणुका पूर्ण करून घ्याव्या लागणार आहेत.
- रवीकिरण खांडेकर, सहकार सहाय्यक अधिकारी