बचतगटांच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचतगटांच्या विविध
उत्पादनांना बाजारपेठ
बचतगटांच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ

बचतगटांच्या विविध उत्पादनांना बाजारपेठ

sakal_logo
By

56904
सिंधुदुर्गनगरी ः प्रदर्शनातील खाद्यपदार्थांची पाहणी करताना सीईओ प्रजित नायर.


बचतगटांच्या विविध
उत्पादनांना बाजारपेठ

दीपावलीचे निमित्त; जि. प. मध्ये विक्री

सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः दिवाळी सणानिमित्त उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यातील कार्यरत स्वयंसहाय्यता समुहाने उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाने १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा परिषदेमध्ये खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शन आयोजित केले आहे.
या कालावधीत जिल्हा परिषदेमध्ये स्वयंसहाय्यता बचतगट समुहाने उत्पादित केलेल्या पदार्थांचे विक्री स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलचे उद्घाटन आज मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. जी. तनपुरे, कुडाळ गटविकास अधिकारी विजय चव्हाण आदींसह जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नायर यांच्यासह अधिकाऱ्यांनी उत्पादित खाद्यपदार्थांची पाहणी केली. तर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी खाद्यपदार्थांची खरेदी करावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. या प्रदर्शनात अनमोल प्रभाग संघ ओरोस, कन्यारत्न स्वयंसहायता समूह ओवळीये, कुलस्वामिनी स्वयंसहायता समूह ओवळीये, हिरकणी महिला प्रभाग संघ माडखोल-सावंतवाडी, श्री स्वामी समर्थ स्वयंसहाय्यता समूह ओरोस (सावंतवाडा) आदींसह विविध स्वयंसहाय्यता समूह सहभागी झाले आहेत.