निवृत्ती वेतनधारकांचे देवगड बीडीओंना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्ती वेतनधारकांचे
देवगड बीडीओंना निवेदन
निवृत्ती वेतनधारकांचे देवगड बीडीओंना निवेदन

निवृत्ती वेतनधारकांचे देवगड बीडीओंना निवेदन

sakal_logo
By

56968

swt1724.jpg मध्ये फोटो आहे.


निवृत्ती वेतनधारकांचे
देवगड बीडीओंना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ ः येथील देवगड तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने निवृत्ती वेतनधारकांच्या विविध समस्यांचे निवेदन येथील गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी निवेदन स्वीकारले. याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन बिर्जे यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
यावेळी असोसिएशनचे तालुकाध्यक्ष नारायण गोगटे, सचिव विलास करंजेकर, सुरेश सोनटक्के उपस्थित होते. निवृत्तीधारकांना दर महिन्याच्या एक किंवा दोन तारीखला पेन्शन मिळाली पाहिजे. सप्टेंबरचे निवृत्ती वेतन जिल्हा परिषद पेन्शनरांना अद्याप मिळालेले नाही. वयोमानानुसार निवृत्ती वेतनात वाढ व्हावी, सेवापुस्तिका जतन करणे, पेन्शनरांना संबंधित यंत्रणेकडून ओळखपत्रे दिली जावीत, यासह अन्य मागण्यांचा समावेश असलेले निवेदन देण्यात आले. दरम्यान, बुधवारी (ता. २०) येथील पंचायत समिती कार्यालयात तालुकास्तरीय पेन्शनर चर्चासत्र घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याचे सोनटक्के यांनी सांगितले.