लांजा-वेरवली बुद्रुकवर ठाकरे शिवसेनेचा भगवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-वेरवली बुद्रुकवर ठाकरे शिवसेनेचा भगवा
लांजा-वेरवली बुद्रुकवर ठाकरे शिवसेनेचा भगवा

लांजा-वेरवली बुद्रुकवर ठाकरे शिवसेनेचा भगवा

sakal_logo
By

वेरवली बुद्रुकवर
ठाकरे शिवसेनेचा भगवा
सरपंचांसह सहा सदस्य विजयी ; कार्यकर्त्यांचा जल्लोष
लांजा, ता. १७ ः सर्व विरोधकांनी एकत्र येत उद्धव ठाकरे शिवसेना गटाला कोंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडत शिवसेनेचे विभाग संघटक रवींद्र डोळस यांनी अखेर वेरवली बुद्रुक ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा भगवा फडकवला आहे. सरपंचपदासह शिवसेनेचे सहा सदस्य निवडून आले आहेत.
वेरवली ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली होती. या ठिकाणी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला होता. सर्व विरोधकांनी एकत्र येत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अशा परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विभाग संघटक रवींद्र डोळस यांनी करीश्मा करत पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या वेदा कोळवणकर या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्याचप्रमाणे एकूण नऊ सदस्यांपैकी मोहन जाधव, विमल जाधव, शुभ्रा करळकर, दीपक पवार, महेंद्र डोळस आणि दीक्षा गुरव हे सहा सदस्य शिवसेनेने निवडून आणले आहेत. विजयानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत, फटाके वाजवून आणि रवींद्र डोळस यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.