
राजापूर-ज्ञानसागर वाचनालयात प्रकट वाचन स्पर्धा
rat17p33.jpg-
57019
राजापूरः शिळ येथे वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करताना सरपंच अशोक पेडणेकर.
------------
ज्ञानसागर वाचनालयात प्रकट वाचन स्पर्धा
राजापूर, ता. १८ : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या चरित्रापासून बोध घेऊन विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन सरपंच अशोक पेडणेकर यांनी केले. यावेळी ज्ञानसागर वाचनालयाच्या वतीने आयोजित प्रकट वाचन स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
शहरानजीकच्या शीळ येथील ज्ञानसागर वाचनालयात ग्रंथप्रदर्शन व प्रकट वाचन स्पर्धा झाली. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ, उपाध्यक्ष संतोष मोंडे, सचिव राजेंद्र बाईत, संचालक नामदेव नागरेकर, पदवीधर शिक्षक उदय सावंत, सहा. शिक्षक प्रशांत कदम, अंगणवाडी सेविका प्रतीक्षा गोंडाळ, ग्रंथपाल स्नेहल मोंडे, लिपिक संतोष गोंडाळ, प्राची बाईत आदी उपस्थित होते. श्री. गोंडाळ यांनी मुलांनी आपल्या गावातील या ज्ञानभांडाराचा विद्याथ्यार्नी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन संतोष मोंडे यांनी केले.