शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा हा करिष्मा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा हा करिष्मा
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा हा करिष्मा

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा हा करिष्मा

sakal_logo
By

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
संघटनेचा हा करिष्मा ः साळवी
लांजा,ता.१७: उपनेते तथा आमदार डॉ.राजन साळवींच्या नेतृत्वाखाली राजापूर, लांजा तालुक्यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेने दणदणीत यश मिळवत ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा हा करिष्मा असल्याचे मत विजयानंतर आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायतीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाने वर्चस्व स्थापन करून कोकण हा मुळ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध केले आहे. लांजा तालुक्यामध्ये १५ पैकी ९ ग्रामपंचायतीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे संघटनेने भगवा फडकवला आहे. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदार संघातील देदिप्यमान व अपेक्षित विजयानंतर येथील बहुतांशी विजयी सदस्यांनी आमदार डॉ.राजन साळवी यांच्या माध्यमातून गावागावात झालेली विकासकामे व शिवसैनिकांची अपार मेहनत यामुळे आपण हा विजय साकार शकल्याचे सांगितले. हा विजय मतदाराच्या विचाराचा, शिवसैनिकांचा असल्याचे सांगून तालुकाप्रमुख, सर्व उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख,उप विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, पं.स.सभापती,सदस्य,जि.प.सदस्य तसेच शिवसैनिकांच्या अपार मेहनतीमुळे मिळाला असल्याची प्रतिक्रिया राजन साळवी दिली.