रत्नागिरी- सतत वाचनाने ज्ञानकक्षा रुंदावतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सतत वाचनाने ज्ञानकक्षा रुंदावतात
रत्नागिरी- सतत वाचनाने ज्ञानकक्षा रुंदावतात

रत्नागिरी- सतत वाचनाने ज्ञानकक्षा रुंदावतात

sakal_logo
By

-rat१७p३२.jpg-KOP२२L५७०१३ रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बाबुराव जोशी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात बोलताना ग्रंथपाल किरण धांडोरे.
-------------
सतत वाचनाने ज्ञानकक्षा रुंदावतात

डॉ. कुलकर्णी ; बाबुराव जोशी ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन
रत्नागिरी, ता. १७ : विद्यार्थ्यांना वैचरिक क्षमता वाढविण्यासाठी आणि व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी निवडक ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. ज्ञान हे एखाद्या समुद्राप्रमाणे अथांग असून सतत जर वाचन करण्याची आपण सवय लावली तर आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढून विकास साधू शकतो. कलाम हे एक आदर्श असे व्यक्तिमत्व होते, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले.
भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी वाचन प्रेरणा दिनी (कै.) बाबुराव जोशी ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. कल्पना आठल्ये, पर्यवेक्षिका प्रा. ए. एम. कुलकर्णी, प्रा. सुनील गोसावी, प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. डी. आर. वालावलकर, ग्रंथपाल किरण धांडोरे उपस्थित होते.
ग्रंथालयाच्या वाचक गट उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना एक जादा पुस्तक किंवा नियतकालिक घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. वर्षअखेरीस आदर्श वाचक पुरस्कार प्रदान करून विद्यार्थ्याचा गौरव केला जातो. ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये यांनी वाचाल तर वाचालचा संदर्भ दिले. महाविद्यालयीन जीवनात विधायक बदल जर घडवून आणायचा असेल तर वाचनाला पर्याय नाही. यासाठी नियमित ग्रंथालयात येऊन वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे, असे आवर्जून सांगितले.

चौकट
निवडक ग्रंथांचे अभिवाचन
विद्यार्थी ओंकार रेवाळे याने वाचन संस्कृतीविषयी विचार मांडले. वाचक गट आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजीतील निवडक ग्रंथांचे अभिवाचन केले. यामध्ये वैष्णवी मुणगेकरने डॉ. कलाम लिखित इग्नायटेड माइंड्स, आर्या केळकरने झुंबर, निधी बडेने कलेक्शन ऑफ चार्ल्स डिकन्स, पूर्वा कदम हिने इट्स ऑल अ मॅटर ऑफ अॅटीट्युड, सिद्धी साखळकर हिने हु इज कलाम, निनाद शेलारने महाराष्ट्राचे शिल्पकार, प्रणोती चांदोरकरने प्रज्ज्वलित मने, देवश्री साळवीने श्यामची आई, कृणाल खेडेकरने परिवर्तनाचा जाहिरनामा, अन्वी साळवीने अच्युत गोडबोले, ओंकार आठवलेने मराठा सत्तेचा उदय या पुस्तकांचे अभिवाचन केले. सानिया योगी हिने विज्ञान विभागातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम स्टुडंट्स कौन्सिल उपक्रमाच्या कामगिरीचा आढावा घेतला.