रत्नागिरी- वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
रत्नागिरी- वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी- वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

rat17p28.jpg-
56956
रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनी घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांसह मागे उभे प्राचार्य डॉ. प्रफुलदत्त कुलकर्णी, प्रा. अस्मिता कुलकर्णी, प्रा. विस्मया कुलकर्णी आणि प्राध्यापक.
-------
अभ्यंकर कनिष्ठ महाविद्यालयात
वाचन प्रेरणा दिन
रत्नागिरी, ता. १८ : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय वाङ्मय मंडळ, दिनविशेष समिती आणि मराठी भाषा विभाग समितीच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, पर्यवेक्षिका प्रा. अस्मिता कुलकर्णी, प्रा. सुनिल गोसावी, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. शिल्पा तारगावकर उपस्थित होते.
यामध्ये नशामुक्त भारत अभियान आणि चित्रावरून काव्यलेखन स्पर्धा घेण्यात आली. सुंदर हस्ताक्षराकडे विद्यार्थी परत वळावेत याकरिता स्क्रिप्ट स्वरूपात माहिती मागवून त्यावर संस्करण करून हस्तलिखिताची निर्मिती करण्यात आल्याचे प्रा. विस्मया कुलकर्णी यांनी सांगितले. पर्यवेक्षिका प्रा. अस्मिता कुलकर्णी यांनी किमान रोज एक तास तरी वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे, असे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाअंतर्गत नशामुक्त भारत अभियान स्पर्धेमधील पूर्वा जाधव, आर्या चव्हाण, श्रवण घवाळी आणि चित्रावरून काव्यलेखन स्पर्धेमधील श्रावणी पारकर, श्रावणी फाटक, पायल केळकर, मेघना गुरव, हर्शाली केळकर, हर्शिता मांदुस्कर या बक्षिसपात्र विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. क्षमा पुनसकर यांनी केले. प्रा. अभिजित भिडे यांनी आभार मानले.