परुळेकरांचे उपोषण तूर्त स्थगित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परुळेकरांचे उपोषण तूर्त स्थगित
परुळेकरांचे उपोषण तूर्त स्थगित

परुळेकरांचे उपोषण तूर्त स्थगित

sakal_logo
By

57028
कणकवली : येथील नगराध्यक्ष दालनात चर्चेवेळी अभियंता रूपेश कांबळे, नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक शिशिर परुळेकर.


परुळेकरांचे उपोषण तूर्त स्थगित

मृताच्या कुटुंबाला भरपाईची मागणी

कणकवली, ता.१७ : येथील भाजपचे नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी उपोषण तूर्त स्थगित केले. विजेचा धक्‍का बसून झालेल्या नागरिकाच्या कुटुंबाला भरपाई देण्याबाबत वरिष्‍ठांशी चर्चा करून निर्णय देऊ, अशी ग्वाही महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांनी दिली. त्यानंतर श्री.परुळेकरांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
शहरातील नागरिक बाळकृष्ण शांताराम तावडे (वय ७० रा. टेंबवाडी) यांचा २९ ऑगस्ट २०२२ रोजी कणकवली बसस्थानकासमोर विद्युत खांबास स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला होता. महामार्ग ठेकेदाराने वीज तारा उघड्या ठेवल्‍याने ही घटना घडल्‍याचे महावितरणच्या तपासणीवेळी समोर आले होते. त्‍यामुळे तावडेंच्या वारसांना भरपाई मिळावी यासाठी नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी आजपासून उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता.
या उपोषणाच्या अनुषंगाने महामार्ग विभागाचे शाखा अभियंता रूपेश कांबळे यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या दालनात येऊन चर्चा केली. यावेळी श्री.नलावडे यांनी महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेत श्री.जाधव यांनी मृतास भरपाई देण्याबाबतचे अधिकार आपणास नाहीत. याबाबत वरिष्‍ठांशी चर्चा करून आठ दिवसांत निर्णय देतो अशी ग्‍वाही दिली. त्‍यानंतर श्री.परुळेकर यांनी महामार्ग विभागाकडून भरपाई बाबत पुढील निर्णय येईपर्यंत उपोषण स्थगित करत असल्‍याचे जाहीर केले. चर्चेवेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक शिशिर परुळेकर, महामार्ग शाखा अभियंता रुपेश कांबळे, तावडे यांचे वारस मनोज तावडे, भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक किशोर राणे, अभय राणे, महेश सावंत, अजय गांगण, राजू गवाणकर आदी उपस्थित होते.