दाभोळ-अमित तांबे सरपंचपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-अमित तांबे सरपंचपदी
दाभोळ-अमित तांबे सरपंचपदी

दाभोळ-अमित तांबे सरपंचपदी

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१७p४०.jpg ः KOP२२L५७०४५ अमित तांबे
-rat१७p४१.jpg ः KOP२२L५७०४६ विधी पवार


गावतळेत विधी पवार, इनामपांगारीत अमित तांबे सरपंच
दाभोळ, ता. १७ : दापोली तालुक्यातील गावतळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी व एक सदस्यासाठी, तसेच इनामपांगारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी रविवारी (ता.१६) मतदान झाले. त्याची आज मतमोजणी झाली. गावतळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी विधी विनोद पवार या ३४३ मते मिळवून विजय झाल्या असून त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शर्वरी श्रीकांत पवार यांना ६१ मते मिळाली. एकही मत नोटाला गेले नाही. याच ग्रामपंचायतीच्या प्रभाग ३ मध्ये महेश खेतले यांना ६२ मते मिळाली. नामदेव पवार हे ७५ मते मिळवून विजयी झाले आहेत. प्रभाग १ मधून अक्षता पवार, उज्वला पवार, प्रणव पवार, प्रभाग क्रमांक २ मधून कविता पवार, राम पवार, प्रभाग क्रमांक ३ मधून रिया म्हाब्दी हे सदस्यपदी बिनविरोध निवडून आले आहेत. इनामपांगारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत अमित अशोक तांबे हे ३५३ मते मिळवून विजयी झाले असून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शांताराम गुणाजी नाचरे यांना १९ मते मिळाली. नोटाला १५ मते मिळाली.याच ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मधून वैभवी निवळकर, विकास निवळकर, सुचिता देवघरकर, प्रभाग क्रमांक २ मधून राजश्री नागले, अनंत महाडिक, प्रभाग क्रमांक ३ मधून किरण गमरे व गुलशन नांदगावकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.