माहिती सहाय्यक चव्हाणांची साताऱ्यात पदोन्नतीने बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माहिती सहाय्यक चव्हाणांची 
साताऱ्यात पदोन्नतीने बदली
माहिती सहाय्यक चव्हाणांची साताऱ्यात पदोन्नतीने बदली

माहिती सहाय्यक चव्हाणांची साताऱ्यात पदोन्नतीने बदली

sakal_logo
By

57063
सिंधुदुर्गनगरी : हेमंतकुमार चव्हाण यांना शुभेच्छा देताना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, मुख्यालय अध्यक्ष संजय वालावलकर, गणेश जेठे, बाळ खडपकर, नंदकुमार आयरे, विनोद दळवी आदी.

माहिती सहाय्यक चव्हाणांची
साताऱ्यात पदोन्नतीने बदली
ओरोस ः जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती सहायक हेमंतकुमार चव्हाण यांची सातारा येथे माहिती अधिकारी पदावर पदोन्नतीने बदली झाली. त्या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्यावतीने त्यांचा पुस्तक, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना काळात विशेषत: लॉकडाऊनमध्ये हेमंतकुमार चव्हाण यांनी माहिती, बातमी देऊन पत्रकारांचे काम सोपे केले, असा गौरवोल्लेख जिल्हा मुख्यालय पत्रकार संघातील पत्रकारांनी केला. जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळ खडपकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, विनोद दळवी, संदीप गावडे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनीही चव्हाण यांच्या कामाचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्या. माहिती सहायक रणजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी नंदकुमार आयरे, मनोज वारंग, दत्तप्रसाद वालावलकर, विनोद परब, सतीश हरमलकर, शांताराम राऊत, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी संदीप राठोड, रवींद्र देवरे, नरेंद्र खोबरेकर, अमित राणे, अविनाश होडावडेकर, महेंद्र भालेकर उपस्थित होते.