
फोटोसंक्षिप्त
57062
आचरा ः येथील उर्दू शाळेचा आदर्श कथामाला शाखा पुरस्कार स्विकारताना संबंधित.
आचरे उर्दू शाळेस आदर्श
कथामाला शाखा पुरस्कार
आचरा ः बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे क्रमांक १ येथील बाल कथाकथन महोत्सवात आचरे उर्दू शाळेचा आदर्श कथामाला शाखा म्हणून प्रकाश पेडणेकर, माजी मुख्याध्यापक-ज्ञानदीप विद्यामंदिर वांगणी हायस्कूल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आनंदराव डिंगणकर, (डेप्युटी झोनल मॅनेजर गोवा झोन बँक ऑफ महाराष्ट्र), अशोक कांबळी, सदानंद कांबळी, चंद्रशेखर धानजी, सुरेश ठाकूर, कथामालेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सय्यद मुश्ताक, अस्मा अशफाफ मुजावर या उर्दू माध्यमातील दोन कार्यकर्त्यांचाही सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना प्रकाश पेडणेकर यांनी आचरे उर्दू शाळेचा आदर्श सर्वाधिक घ्यावा, कथामालेचे वेगवेगळे उपक्रम सर्वांनी राबवावेत आणि संस्कारांची जोपासना बालमनावर करावी, असे आवाहन केले. उर्दू शाळेच्यावतीने सय्यद मुश्ताक यांनी मनोगत व्यक्त केले.