राजापुरात वर्चस्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापुरात वर्चस्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे
राजापुरात वर्चस्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे

राजापुरात वर्चस्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१७p४३.jpg-KOP२२L५७०५९ राजापूर ः ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांसोबत विजयाचा जल्लोष करताना आमदार राजन साळवी.
----------

राजापुरात वर्चस्व उद्धव ठाकरे शिवसेनेचे

आमदार साळवींचे श्रेय ः भालावली सरपंचपदी भाजपची बाजी;
राजापूर, ता. १७ : तालुक्यामध्ये निवडणूका झालेल्या दहापैकी पाच ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. पाचपैकी सागवेसह चार ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वर्चस्व राखल्याचा दावा केला आहे. भालावली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपाच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला.
तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. पाच ग्रामपंचायतींसाठी रविवारी (ता. १६) मतदान झाले होते. त्याची आज तहसीलदार शीतल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या किसान भवन सभागृहामध्ये मतमोजणी झाली. त्याचा ग्रामपंचायतनिहाय निकाल असा ः सर्व विजयी उमेदवार ः राजवाडी ः सरपंच ः अजित बंडबे, सदस्य ः किरण बंडबे, सुनील वाघरे, आर्या लाड, माधुरी गिरकर, शालीनी जाधव, आरोही जाधव, सागर जाधव.
आंगले ः सरपंच- श्रीधर सौंदळकर, सदस्य ः वासुदेव गराटे, दत्तात्रय राऊत, संस्कृती सौंदळकर, विजय राऊत, गौतमी जाधव, सेजल पांचाळ, प्रगती राऊत. भालावली ः सरपंच ः प्रकाश घवाळी, सदस्य ः रामचंद्र झोरे, प्रणोती केळवाडकर, अनघा सिनकर, प्रवीण जाधव, अश्‍विनी हळदणकर, उषा मराठे, सूर्यकांत साळवी, विलास गुरव, सुवर्णा गुरव. कोंड्येतर्फ सौंदळ ः सरपंच ः मिनल तळवडेकर, विजय आगटे, हेमंत उपळकर, समिक्षा शिवगण, महेश कारेकर, विजया तळवडेकर, प्रतिक्षा भातडे, साक्षी हर्डीकर, प्रतिक्षा घाणेकर, संतोष टक्के. सागवे ः सरपंच ः सोनाली टुकरूल, मसूद शेख, मर्यमबी बोरकर, रझिया बगदादी, मधुकर जोशी, संदेश बोटले, साक्षी मांजरेकर, कृष्णकांत मोंडे, योगिता नाकटे, निलाक्षी येरम, मंगेश गुरव, संपदा नार्वेकर, अनुष्का राणे, बोरकर अब्दुल रज्जाक अब्दुल लतीफ, जुनेद मुल्ला, परवीन बोरकर. जोरदार घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी करीत आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी विजयाचा जोरदार जल्लोष केला.