सावंतवाडी ‘खरेदी-विक्री’त भाजपचे कोळमेकर बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडी ‘खरेदी-विक्री’त
भाजपचे कोळमेकर बिनविरोध
सावंतवाडी ‘खरेदी-विक्री’त भाजपचे कोळमेकर बिनविरोध

सावंतवाडी ‘खरेदी-विक्री’त भाजपचे कोळमेकर बिनविरोध

sakal_logo
By

57066
दत्ताराम कोळमेकर

सावंतवाडी ‘खरेदी-विक्री’त
भाजपचे कोळमेकर बिनविरोध

शेळकेंचा अर्ज अवैध; ‘महविकास’ला धक्का

सावंतवाडी, ता. १७ ः येथील खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गट युतीचे उमेदवार दत्ताराम कोळमेकर हे बिनविरोध निवडून आले. या ठिकाणी प्रतिस्पर्धी म्हणून महविकास आघाडीच्यावतीने गंगाराम शेळके यांनी उमेदवारी अर्ज भरला होता; मात्र छाननी प्रक्रियेत तो अवैध ठरल्यामुळे कोळमेकर हे बिनविरोध विजयी झाले. अखेर नव्या युती सरकारने तालुक्यात आपले खाते खोलले, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँक संचालक तथा भाजप नेते महेश सारंग यांनी दिली. कोळमेकर यांचे त्यांनी अभिनंदनही केले.
राज्यात सत्ता बदलानंतर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीने सिंधुदुर्गात पहिले यश प्राप्त करीत विजयाचे खाते खोलले आहे. सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत ‘महाविकास’ला बाळासाहेबांची सेना अन् भाजप युतीने पहिला धक्का दिला आहे. खरेदी-विक्री संघावर युतीची एक जागा बिनविरोध ठरली असून मविआचे शेळके यांचा अर्ज अवैध ठरल्याने युतीचे कोळमेकर हे भटक्या विमुक्त जातीतून बिनविरोध निवडून आले. भाजप व बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पहिली निवडणूक युती ही जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात झाली असून सावंतवाडी खरेदी-विक्री संघात झालेली युती आगामी निवडणुकांत देखील दिसून येईल, असा विश्वास दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून यावेळी व्यक्त करण्यात आला. या निवडणुकीत खरेदी-विक्री संघातील १५ जागांपैकी एका जागेवर युतीचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना युतीत उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. ही युतीच्या ताकदीची अन् विजयाची नांदी असून विजयाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरू राहील, असा दावा यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस तथा जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी केला.