कणकवली :क्रीडा स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली :क्रीडा स्पर्धा
कणकवली :क्रीडा स्पर्धा

कणकवली :क्रीडा स्पर्धा

sakal_logo
By

शालेय क्रीडा स्पर्धेच्या
नियोजनासाठी आज सभा
कणकवली, ता. १८ ः मागील दोन वर्षांनंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षात शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास शासनाने मान्यता दिली असून, त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धा आयोजन पुढील महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची सभा क्रीडा परिषेदेचे अध्यक्ष तहसीदार रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या (ता. १९) दुपारी अडीचला तहसील कार्यालय, कणकवली येथे होणार आहे. तालुकास्तरावर दहा खेळांच्या कुस्ती, योगा, कॅरम, तायक्वांदो, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल व अॅथलेटिक्स, मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन होणार आहे. तालुक्यातील प्रत्येक प्रशालेतील क्रीडाशिक्षकांनी तसेच क्रीडाप्रेमी व तालुक्यातील एकविध खेळ संघटना असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस आणि कणकवली तालुका समन्वयक बयाजी बुराण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.