खेड-दापोली विधानसभा मतदारसंघांत शिंदे गटाची सरशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-दापोली विधानसभा मतदारसंघांत शिंदे गटाची सरशी
खेड-दापोली विधानसभा मतदारसंघांत शिंदे गटाची सरशी

खेड-दापोली विधानसभा मतदारसंघांत शिंदे गटाची सरशी

sakal_logo
By

KOP२२L५७०९४
-rat१७p४५.jpg- खेड ः नांदगाव खारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडून आल्याबद्दल महेश पालकर यांचा सन्मान करताना कार्यकर्ते.
----------

दापोली विधानसभा मतदारसंघांत शिंदे गटाची सरशी
ग्रामपंचात निवडणुकीत आमदार योगेश कदमांचे यश ; ८ ग्रामपंचायतीवर वर्चस्व
खेड, ता. १७ : ग्रामपंचात निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघांतील ९ पैकी आठ ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने वर्चस्व प्राप्त केले असल्याचा दावा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी केला आहे. या निवडणुकांमध्ये खेड तालुक्यात आस्तान ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. या निवडणुकीतही शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचा सरपंचपदाचा उमेदवार केवळ एका मताने विजयी झाला आहे.
खेड तालुक्यात आस्तान,वडगाव, देवघर, तर मंडणगड तालुक्यात घराडी अन निगडी या सात ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूका जाहीर झाल्या होत्या. आमदार योगेश कदम नेतृत्व करत असलेल्या दापोली विधानसभा मतदार संघातील निवडणुकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. दापोली मतदार संघातील दहा पैकी आठ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने वर्चस्व प्रथापित केल्याचा दावा आमदार योगेश कदम आणि त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
दापोली विधान सभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या खेड तालुक्यातील आस्तान ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे अवघ्या तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचा सरपंच पदाचा उमेदवार केवळ एका मताने विजयी झाला त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निकालाबाबत संशय निर्माण झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निकालाबाबत आक्षेप घेत फेर मतमोजणी घेण्याचे मागणी केली. जसजसे निवडणुकांचे निकाल जाहीर होत होते तसतसे आमदार योगेश कदम यांचे समर्थक जल्लोष करत होते.


नांदगावात गाव पॅनेल
मंडणगड तालुक्यातील निगडी, घराडी व दापोली तालुक्यातील फणसू, नवसे व गावतळे तर खेड तालुक्यातील वडगाव, अस्तान आणि देवघर ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येथे आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर दापोली तालुक्यातील इनाम पांगारी व खेड तालुक्यातील सुसेरी या ग्रामपंचायती गाव पॅनेलच्या माध्यमातून लढवण्यात आल्या आहेत. तसेच खेड तालुक्याच्या गुहागर मतदार संघातील असगणी, तळघर ग्रामपंचायतींवर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा वरचष्मा आहे. नांदगाव ग्रामपंचायतीवर गाव पॅनलचे वर्चस्व आहे.
--
कोट
खऱ्या हिंदुत्वाचा आवाज म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना हीच मूळ शिवसेना असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी परिश्रम घेत आहोत. ग्रामपंचायतीच्या मतदानाचा कौल ही फक्त सुरुवात आहे. यापुढे आमचा विजय निश्चित आहे.
--आमदार योगेश कदम