कोकणात आता विकास प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात आता विकास प्रक्रिया
कोकणात आता विकास प्रक्रिया

कोकणात आता विकास प्रक्रिया

sakal_logo
By

57089
नितेश राणे

कोकणात आता विकास प्रक्रिया

नितेश राणे ः गिर्येत लवकरच मत्स्यव्यवसाय अभ्यासक्रमावर अधारीत महाविद्यालय

कणकवली, ता. १७ ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोकणवर सातत्याने अन्याय होत होता. मात्र, शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर खऱ्या अर्थाने विकास प्रक्रिया सुरू झाली आहे. कोकणातले पहिले आधुनिक मत्स्यव्यवसाय अभ्यासक्रम आधारित महाविद्यालय गिर्ये (ता.देवगड) येथे होणार आहे, अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. राणे म्हणाले, ‘‘कोकणावर सातत्याने अन्याय होत आहे. गेल्या अडीच वर्षात कोकणच्या विकासासाठी एकही पैसा आला नाही. मात्र, भाजप आणि शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यात प्रलंबित असलेली विविध रस्त्यांच्या विकासाची कामे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून होत आहेत. सत्तेत आल्यापासून विविध विकास कामांची निर्णय हे सरकार घेत आहे. त्याचबरोबर किनारपट्टी भागामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. परंतु, येथे आधुनिक पद्धतीचा अभ्यासक्रम असलेले महाविद्यालय नव्हते. यासाठी नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठच्या माध्यमातून देवगड येथे मासेमारीवर आधारित महाविद्यालय सुरू होत आहे. येथे आवश्यक असलेली २६ हेक्टर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याची संपूर्ण प्रक्रिया आपण राबवली. आता कोणत्याही क्षणी त्याला मंजुरी मिळेल.’’
---
नव तंत्रज्ञानही...
राणे म्हणाले, ‘‘आधुनिक मासेमारीबरोबर नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. नागपूर येथे ३४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच धर्तीवर सिंधुदुर्गातही मत्स्य महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रम असतील. जिल्ह्यात दोन मेडिकल कॉलेज, अभियांत्रिकी कॉलेज अशा विविध सुविधा असून आता आमच्या सरकारच्या माध्यमातून मत्स्य महाविद्यालय सुरू होत आहे. याचबरोबर जिल्ह्यात रखडलेल्या विविध योजना पुढे घेऊन जात आहोत.’’
---
रेल्वे मार्ग, मिनी ट्रेनबाबत प्रयत्न
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाची निर्मिती, मिनी ट्रेन याबाबतही प्रयत्न सुरू झाले आहेत. सरकारच्या माद्यमातून विविधस कामांमध्ये फोंडाघाटबाजार पेठ रस्ता काँक्रीटीकरण होणार आहे. या जिल्हाकडे सकारात्म दृष्टीकोणातून सरकार लक्ष देत आहे. येत्या काळामध्ये जिल्ह्यात रखडलेला सी-वल्ड प्रकल्प ही मार्गी लागेल असा विश्वास आहे. सरकार आमचे असल्याने जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे असे मतही राणे यांनी व्यक्त केले.