पान एक-पेंडूर-सातवायंगणी येथे शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-पेंडूर-सातवायंगणी येथे
शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला
पान एक-पेंडूर-सातवायंगणी येथे शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला

पान एक-पेंडूर-सातवायंगणी येथे शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला

sakal_logo
By

पान एक

गव्याच्या हल्ल्यात
शेतकरी गंभीर जखमी
पेंडूर-सातवायंगणीत बागेत कामास जाताना घटना
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १७ ः गव्याने अचानक केलेल्या हल्ल्यात पेंडूर-सातवायंगणी येथील शेतकरी गंभीर जखमी झाला. शशिकांत बाबूराव नाईक (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सकाळी आठच्या सुमारास घडली. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
अधिक माहिती अशी, शशिकांत नाईक आज सकाळी घराशेजारील नारळ बागेत कामासाठी गेले होते. बागेत अचानक त्यांच्या मागून आलेल्या गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती वन अधिकाऱ्यांना येथील सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी यांनी फोन करून दिल्यानंतर वन अधिकारी श्री. इब्रामपूरकर व श्री नराळे उपस्थित होत घटनेची माहिती घेतली. नाईक यांचा जबाब नोंदवून त्यांना उपचारासाठी तत्काळ १० हजार रुपयांची मदत दिली.
पेंडूर परिसरात गेले अनेक दिवस गव्यांनी थैमान घातले आहे. शेतीचेही नुकसान केले आहे. आता तर शेतकऱ्यावर हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.