कथामालेतून मुलांचा व्यक्तिमत्व विकास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कथामालेतून मुलांचा व्यक्तिमत्व विकास
कथामालेतून मुलांचा व्यक्तिमत्व विकास

कथामालेतून मुलांचा व्यक्तिमत्व विकास

sakal_logo
By

57169
आचरा ः कथाकथनातील यशस्वी मुलांसोबत मान्यवर.


कथामालेतून मुलांचा व्यक्तिमत्व विकास

आनंद डिंगणकर ः आचऱ्यात कथाकथन महोत्सवास प्रतिसाद

आचरा, ता. १८ ः संस्कारांची जपणूक आणि बचतीचे संस्कार मुलांचा व्यक्तिमत्व विकास साधतात. यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतोच; पण साने गुरुजी कथामाला मालवणच्या विविध उपक्रमांनी बालकांच्या मनावर होणारे संस्कार हे चिरकाल टिकणारे आहेत, असे मत बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय अधिकारी आनंद डिंगणकर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या चार गटात घेण्यात आलेल्या बाल कथाकथन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत विविध गटांत नावीन्य डोळस, समर्थ सोलापुरे, किंजल परब, अस्मी पारकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पेडणेकर, सुरेश ठाकूर, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरेचे अध्यक्ष अशोक कांबळी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सदानंद कांबळी, लक्ष्मणराव आचरेकर, तात्या भिसळे, बाळू धुरी, सुगंधा गुरव, स्मिता जोशी, तुकाराम पडवळ, सुरेश गावकर, अनिरुदध आचरेकर, सुधीर धुरी, पांडुरंग कोचरेकर, परशुराम गुरव आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा ः गट अ (तिसरी)-नावीन्य डोळस (मसुरे देऊळवाडा), सक्षम पांगम (आचरा नं. १), अर्णव पाटील (तोंडवळी वरची), उत्तेजनार्थ-स्पृहा पवार (त्रिंबक बगाडवाडी), वैष्णवी परब (आचरे डोंगरेवाडी), गट ब (चौथी)-समर्थ सोलापुरे (चिंदर पालकरवाडी), भाग्यश्री हडकर (हडी नं.२), स्वरा कदम (आचरे डोंगरेवाडी), उत्तेजनार्थ-दुर्वा आचरेकर (आचरे बागजामडूल), उत्तेजनार्थ-आराध्य परब (त्रिंबक साटमवाडी). गट क पाचवी ते सहावी-किंजल परब (चिंदर भगवंतगड), यशश्री ताम्हणकर (मसुरे नं.१), रिद्धी कांबळी (आचरे हिर्लेवाडी), उत्तेजनार्थ-नुर्वी शेटगे (आचरे नं. १), सोनिया तोंडवळकर (तोंडवळी वरची). गट-ड सातवी ते आठवी-अस्मी पारकर (ओझर हायस्कूल), दिया गोलतकर (तोंडवळी वरची), स्नेहल घाडी (आचरे नं. १), उत्तेजनार्थ-श्रेया मगर (मसुरे नं. १), महम्मद सय्यद (आचरा उर्दू).
परीक्षक म्हणून सुरेंद्र सकपाळ, नितीन गावकर, मधुरा माणगावकर, अनघा कदम, ऋतुजा केळकर, महादेव बागडे, सुजाता टिकले, उज्ज्वला धानजी यांनी काम पाहिले. गुरुनाथ ताम्हणकर, रामचंद्र कुबल यांनी सूत्रसंचालन केले. नवनाथ भोळे यांनी आभार मानले.