रोटरीचा ‘निरामय’ उपक्रम स्तुत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरीचा ‘निरामय’ उपक्रम स्तुत्य
रोटरीचा ‘निरामय’ उपक्रम स्तुत्य

रोटरीचा ‘निरामय’ उपक्रम स्तुत्य

sakal_logo
By

57183
कुडाळ ः रोटरी क्लब व एमआयडीसी असोसिएशनतर्फे आयोजित शिबिरात बोलताना नीता गोवेकर.


रोटरीचा ‘निरामय’ उपक्रम स्तुत्य

नीता गोवेकर ः कुडाळात आरोग्य तपासणी शिबिर

कुडाळ, ता. १८ ः रोटरी क्लब कुडाळने एमआयडीसी कामगारांसाठी राबविलेला ‘निरामय’ आरोग्य तपासणी उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन असिस्टंट गव्हर्नर नीता गोवेकर यांनी केले.
येथील रोटरी क्लब ऑफ व एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामगारांसाठी ‘निरामय’ कार्यक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन डॉ. संजय केसरे यांच्या सुयश हॉस्पिटल येथे करण्यात आले. यावेळी कुडाळ रोटरीचे अध्यक्ष अमित वळंजू, खजिनदार डॉ. केसरे, कुडाळ एमआयडीसी असोसिएशन उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, डॉ. जयश्री केसरे, रोटरी सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष अॅड. राजीव बिले, माजी अध्यक्ष राजन बोभाटे, माजी असिस्टंट गव्हर्नर शशिकांत चव्हाण, एरिया गव्हर्नर अॅड. गजानन कांदळगावकर, अभिषेक माने, राजेंद्र केसरकर, प्रमोद भोगटे, एमआयडीसी खजिनदार उदय शिरोडकर, एच. बी. वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.
‘निरामय’ कार्यक्रमांतर्गत यापूर्वी येथील एमआयडीसीमधील आरोग्य शिबिरात ज्या १६४ कामगारांची रक्त तपासणी करण्यात आली होती, त्यांचे अहवाल डॉ. केसरे यांनी तपासून त्यातील गरज असलेल्या २३ जणांची सुयश हॉस्पिटल येथे मोफत तपासणी केली. एकनाथ पिंगुळकर यांनी सूत्रसंचालन केले. शिबिरासाठी डॉ. संजय केसरे, डॉ. जयश्री केसरे आदींनी मेहनत घेतली. अध्यक्ष वळंजू यांनी आभार मानले.