उद्योग-व्यवसायांतून उन्नती साधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योग-व्यवसायांतून उन्नती साधा
उद्योग-व्यवसायांतून उन्नती साधा

उद्योग-व्यवसायांतून उन्नती साधा

sakal_logo
By

57182
कुडाळ ः दिवाळी खरेदी महोत्सवाची पाहणी करताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी. (छायाचित्र ः अजय सावंत)


उद्योग-व्यवसायांतून उन्नती साधा

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी; कुडाळ मधील खरेदी महोत्सवाला भेट

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः नर्मदाआई संस्थेने जिल्ह्यातील महिलांना दिवाळी खरेदी महोत्सवाच्या माध्यमातून व्यावसायिक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली, हे निश्चितच कौतुकास्पद व समाजाला प्रेरणादायी आहे. महिलांनी अशा छोट्या व्यवसायांतून आर्थिक उन्नती साधून भविष्यात नामांकित उद्योजिका म्हणून पुढे यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रविवारी सायंकाळी येथील दिवाळी खरेदी महोत्सवात केले.
जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी रविवारी (ता. १६) सायंकाळी दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर येथील महालक्ष्मी सभागृहात १९ पर्यंत सुरू असणाऱ्या दिवाळी खरेदी महोत्सवाला भेट दिली. जिल्ह्यातील ४४ स्टॉल या ठिकाणी असून सर्व स्टॉलना त्यांनी भेट देत नोउद्योजिका महिलांशी व्यवसायाबाबत संवाद साधला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे, उद्योजक गजानन कांदळगावकर, स्नेहा कुबल, जिल्हा बँक महिला विकास अधिकारी नमिता खेडेकर, जिल्हा संसाधनच्या अरिता तेंडुलकर, गीतांजली कांदळगावकर, संस्थेच्या दीप्ती मोरे, प्रज्ञा राणे, अनुजा सावंत, मुक्ती परब, रेखा काणेकर, अक्षता कुडाळकर, साधना माडये, जिल्ह्यातील स्टॉलधारक नवोद्योजिका उपस्थित होत्या. तेरसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे गणेश मूर्ती भेट देऊन स्वागत केले.
---
चौकट
तेरसे व टीमचे कौतुक
जिल्हाधिकारी म्हणाल्या की, ‘‘नर्मदाआई संस्थेच्या अध्यक्ष संध्या तेरसे व त्यांच्या टीमने दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला व्यावसायिक व्यासपीठ मिळावे, यासाठी टाकलेले पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी असा विशाल दूरदृष्टीकोन असल्यास महिला आर्थिक सक्षम होण्यास वेळ लागणार नाही. तेरसे व त्यांच्या टीमने पुढच्या वर्षी सुद्धा अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम हाती घेऊन वाटचाल करावी.’’