संतोष वैज यांना पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संतोष वैज यांना पुरस्कार
संतोष वैज यांना पुरस्कार

संतोष वैज यांना पुरस्कार

sakal_logo
By

संतोष वैज यांना पुरस्कार
सावंतवाडी ः सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीतर्फे यावर्षीचा ‘उपक्रमशील शिक्षक’ पुरस्कार प्रशालेचे शिक्षक संतोष वैज यांना देऊन गौरविण्यात आले. संस्थेच्यावतीने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात उत्कृष्ट अध्यापन करणारे, विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे व निधी संकलन, विविध उपक्रमात सहभाग घेणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून संतोष वैज यांची निवड झाली. सोहळा कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या पुरस्कारासाठी पुरस्कार वितरण सोहळा कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात संस्था पदाधिकारी, शिक्षक यांच्या उपस्थितीत झाला. संस्थाध्यक्ष शैलेश पई यांच्या हस्ते वैज यांना गौरविण्यात आले. यावेळी शिक्षक प्रसाद कोलगावकर, धोंडी वरक, शिक्षिका ज्योती पावसकर, सोनाली बांदेकर यांनाही विशेष शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
--
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी : गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक ३१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ११.६ मिलीमीटर पाऊस झाला. तर एकूण सरासरी ३२९९.९ मिलीमीटर पाऊस झाला. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- ०.१ (२६४५.४), मालवण- ८.८ (२९७०.२), सावंतवाडी- १९.१ (३६२३.१), वेंगुर्ले- १.१ (२९५९.४), कणकवली-१२.९ (३६३४.३), कुडाळ- ९.९ (३४७५.७), वैभववाडी- ३१.२ (४०५७.३), दोडामार्ग-३०.४ (३६५३.४).
..............
ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक
सिंधुदुर्गनगरी ः डिसेंबर २०२२ अखेरीस मुदत संपणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३५२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर निवडणुका होण्यासाठी मतदार यादी तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३० ग्रामपंचायती आहेत. त्यातील ३५२ ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत डिसेंबर अखेरीस संपत आहे. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
-------------
अध्यक्षपदासाठी सावंतांचे मतदान
कणकवली ः अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीसाठी टिळक भवन दादर-मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी यांनी मतदान केले. यासाठी मल्लिकार्जुन खर्गे व शशी थरूर हे उमेदवार रिंगणात आहेत. येथे सिंधुदुर्गमधील आठजणांना मतदानाचा हक्क होता. यावेळी आपण मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत यांनी दिली.
--
मळगावात दिवाळी अंक योजना
सावंतवाडी ः मळगाव येथील (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरतर्फे वाचकांसाठी यावर्षी दिवाळी अंक योजना राबविण्यात येत आहे. दर्जेदार दिवाळी अंक फक्त ५० रुपयांत वाचायला मिळणार आहेत. वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.