राजापूर तालुक्यातील तीन निवडणुकीत ठाकरे गटाचा भगवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर तालुक्यातील तीन निवडणुकीत ठाकरे गटाचा भगवा
राजापूर तालुक्यातील तीन निवडणुकीत ठाकरे गटाचा भगवा

राजापूर तालुक्यातील तीन निवडणुकीत ठाकरे गटाचा भगवा

sakal_logo
By

तालुक्यातील तीन निवडणुकीत ठाकरे गट प्रबल
राजन साळवी ; शिवसेना वर्चस्व राखण्यात यशस्वी
राजापूर, ता. १८ : राजापूर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भगवा फडकविल्याचा दावा या गटाचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी केला आहे. त्यांनी दावा केलेल्या ग्रामपंचायतींमध्ये राजापुरातील दहापैकी आठ, लांजा येथील पंधरापैकी नऊ, तर रत्नागिरीतील चारपैकी तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिनंदन केल्याची माहिती आमदार साळवी यांनी दिली.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका आणि ग्रामीण भागावरील राजकीय वर्चस्वाच्यादृष्टीने या ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले होते. या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतमोजणी झाली. या निकालानंतर राजापूर, लांजा आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वर्चस्व राखल्याचा दावा या गटाचे उपनेते आणि आमदार साळवी यांनी केला आहे. कोकण हा मूळ शिवसेनेचा बालेकिल्ला असून या ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालानंतर कोकणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेने आपले वर्चस्व सिद्ध केल्याची प्रतिक्रिया श्री. साळवी यांनी व्यक्त केली आहे. हा विजय मतदारांच्या विचाराचा, शिवसैनिकांचा आणि पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीमुळे मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.