पान दोन मेन सेकंड मेन-...तर साटेली-भेडशी आरोग्य केंद्राचे उद्धाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान दोन मेन सेकंड मेन-...तर साटेली-भेडशी आरोग्य केंद्राचे उद्धाटन
पान दोन मेन सेकंड मेन-...तर साटेली-भेडशी आरोग्य केंद्राचे उद्धाटन

पान दोन मेन सेकंड मेन-...तर साटेली-भेडशी आरोग्य केंद्राचे उद्धाटन

sakal_logo
By

57201

पान दोन सेकंड मेन

टीप ः swt1817.jpg मध्ये फोटो आहे.

...तर साटेली-भेडशी आरोग्य केंद्राचे उद्‍घाटन
---
प्रदीप नाईक; लोकार्पणासाठी होतेय चालढकल, गोरगरीब रुग्णांचे होताहेत हाल
सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. १८ : ठेकेदार आणि आरोग्य अधिकारी मिळून साटेली भेडशी आरोग्य केंद्राच्या कामाला मुदतवाढ देत लोकार्पणाचा कार्यक्रम सतत पुढे ढकलत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. ते टाळण्यासाठी आता सर्वसामान्यांच्या हस्ते आरोग्य केंद्राचे उद्‍घाटन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीप नाईक यांनी दिला आहे.
लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याने आरोग्य केंद्र रुग्णांसाठी खुले झाले काय अथवा नाही, त्याचे त्यांना काहीही पडलेले नाही. कोरोना काळात इमारत नसल्याने सर्वांत वाईट परिस्थिती रुग्णांना अनुभवास आली होती. स्थानिक लोकप्रतिनिधींना गोरगरीब रुग्णांचा कळवळा असता, तर त्यांना जुन्या इमारतीच्या उघड्या व्हरांड्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे हाल दिसले असते आणि त्यांनी आरोग्य केंद्राचे काम तत्काळ पूर्ण होऊन ते रुग्णांच्या सेवेसाठी सुरू व्हावे म्हणून प्रयत्न केले असते. ठेकेदाराचे लाड पुरविण्यासाठी काम पूर्ण करण्यास मुदतवाढ मिळावी म्हणून ठेकेदाराची पाठराखण केली नसती, असेही नाईक यांनी म्हटले आहे.

रुग्णांचे हाल
वेदनादायी
उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना जागेअभावी दोडामार्ग अथवा गोव्याला पाठविले जाते. त्यात त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. जे इथे उपचार घेतात, त्यांना व्हरांड्यात ऊन-पावसाचा त्रास सहन करावा लागतो. स्वच्छतागृहात पुरेसे पाणी नाही. प्रसूतीसाठी कक्ष नाही. आंतररुग्णांना जागा नाही, असे अनेक प्रश्न आहेत. रुग्णांचे हाल खूप वेदना देणारे आहेत.

‘ते’ आता
कुठे आहेत?
राजकीय पक्षाचे काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी गेल्या काही महिन्यात आपणच या केंद्राचे उद्‍घाटन करणार, अशा घोषणा केल्या होत्या. काहींनी उपोषण करून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यांनी काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्वाही देत लवकरात लवकर आरोग्य केंद्र रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल, अशी आशा दाखवली होती. ते सगळे जण आता कुठे आहेत, असा प्रश्नही श्री. नाईक यांनी विचारला आहे.