अमित पंडित यांच्या अनुवादित कादंबरीचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमित पंडित यांच्या अनुवादित कादंबरीचे प्रकाशन
अमित पंडित यांच्या अनुवादित कादंबरीचे प्रकाशन

अमित पंडित यांच्या अनुवादित कादंबरीचे प्रकाशन

sakal_logo
By

rat18p15.jpg
57249
साखरपा : अमित पंडित यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.


अमित पंडित यांच्या अनुवादित कादंबरीचे प्रकाशन
साखरपा, ता 17 : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साखरपा विभागाचे प्रमुख आणि शिक्षक अमित पंडित यांनी अनुवादित केलेल्या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात हे प्रकाशन करण्यात आले.
कोमसाप देवरुख शाखेच्या साखरपा विभागातर्फे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्याने साखरपा विभाग प्रमुख अमित पंडित यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. साखरपा केंद्रशाळेचे शिक्षक बाबासाहेब लाड यांनी प्रारंभी कादंबरीचा थोडक्यात परिचय करून दिला. त्याच बरोबर मूळ लेखक अँथनी होप यांचाही परिचय लाड यांनी करून दिला. त्यानंतर देवरुख शाखा अध्यक्ष दीपक लिंगायत, आबा सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, तसेच केंद्रीय प्रमुख सहदेव पाटील, शिक्षक अभिमन्यू शिंदे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. अमित पंडित यांचे हे ११ वे पुस्तक आहे. ह्या आधी दोन एकांकिका, एक दोन अंकी नाटक, दोन कथासंग्रह, दोन अनुवादीत कथासंग्रह, एक अनुवादीत कादंबरी, एक बाल कादंबरी आणि एक माहितीपर अशी दहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कोमसापच्या हर्षा आठल्ये, शिक्षक उमेश डावरे, रेवती पंडित, मैत्रेयी रेमणे, सतीश वाकसे, प्रभा जाधव आदी उपस्थित होते.