पुणे, सांगली, ठाणे, उस्मानाबाद उपांत्य फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे, सांगली, ठाणे, उस्मानाबाद उपांत्य फेरीत
पुणे, सांगली, ठाणे, उस्मानाबाद उपांत्य फेरीत

पुणे, सांगली, ठाणे, उस्मानाबाद उपांत्य फेरीत

sakal_logo
By

rat१८p११.jpg-
५७२३७
रत्नागिरीः सुर मारून पुण्याच्या खेळाडूला बाद करताना रत्नागिरीचा खेळाडू

पुणे, सांगली, ठाणे, उस्मानाबाद उपांत्य फेरीत
राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा ः रत्नागिरी मुले उपांत्यपूर्व फेरीत पराभूत
रत्नागिरी, ती. १८ः येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरु असलेल्या ३७ व्या किशोर, किशोरी राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत पुणे, सांगलीच्या दोन्ही तर ठाणे, उस्मानाबादच्या मुलांच्या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. यजमान रत्नागिरीचा मुलांचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला.
उपउपांत्य फेरीचे सामने चुरशीचे झाले. यजमान रत्नागिरीच्या संघाने बलाढ्य पुणे संघाला चांगलेच झुंजवले. या सामन्यात पुण्याने ७ गुणांनी (२०-१३) विजय मिळवला. पुण्यातर्फे सुबोध चव्हाण १.३०, १.४० मिनिटे संरक्षणाचा खेळ करत तिन गडी बाद केले. त्याला अद्वेत बाईतने १.३०, १ मि. संरक्षण करत दोन्ही डावात पाच गडी बाद करून चांगली साथ दिली. शाश्वत थोरातने दोन्ही डावात ५ गडी बाद केले. रत्नागिरीतर्फे अथर्व गराटेने १.१० मि. आणि १.३० मि. संरक्षण करत दोन्ही डावात ८ गडी टिपले. त्याला आशिष बालदेने १.३० मि., ०.५० सें. खेळ करतानाच २ गडी बाद करुन चांगली साथ दिली. मात्र ते पराभव टाळू शकले नाहीत. दुसर्‍या सामन्यात सांगलीने नाशिकचा १ डाव २ गुणांनी (१०-८) पराभव केला. विजयी संघातर्फे वंदोत इनामदार (३.२० मि. संरक्षण), रितेश बिराजदारने (२.१०, १.२० मि.), संग्राम डोंबाळेने (१.३० मि. संरक्षण व ४ गडी) चांगला खेळ केला. नाशिकतर्फे जयेश नगडेने १.२० मि. खेळ केला. तिसर्‍या सामन्यात बलाढ्य ठाणे संघाने सोलापूरचा २ गुण आणि ६.१० मिनिटे (१२-१०) राखून विजयी झाला. ठाणेतर्फे करण गुप्ता (२.२० मि.), ओमकार सावंत (२.००, १.०० मि. संरक्षण व २ गडी) चमकदार कामगिरी केली. सोलापूरकडून महिबुब मज्जाने (१.४० मि. व १ गडी) चांगला खेळ केला. चौथ्या सामन्यात उस्मानाबाद संघाने सातार्‍याचा १ डाव आणि ८ गुणांनी (१५-७) सहज पराभव केला. विजयी संघातर्फे राज जाधव (२.१० मि. संरक्षण व २ गडी), जितेंद्र वसावे (३ मि. व ४ गडी), सोत्या वळवी (२.१० मि. व ६ गडी) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
किशोरी गटातील सामन्यात सांगलीने सोलापूरचा १ गुण आणि ५ मिनिटे ५० सेकंद (११-१०) राखून पराभव केला. विजयी संघातर्फे स्वप्नाली तामखडे (१.१०, २.०० मि. व १ खेळाडू), विद्या तामखडे (१.००, १.३० मि. आणि १ खेळाडू), समीक्षा शिंदेने (१.४०, २.०० मि. आणि १ खेळाडू) असा खेळ केला. सोलापूरकडून स्नेहा लामकाने (२.२०, १.००, १.४० मि. आणि १ खेळाडू) चांगला खेळ केला. दुसर्‍या सामन्यात पुण्याने सातार्‍याचा १ गुण आणि ४ मि. ४० सें. राखून (११-१०) पराभव केला. विजयी संघातर्फे आर्या वाघने (३.१०, १.३० मि. व १ खेळाडू), श्वेता नवलेने (२.५० मि. आणि २ खेळाडू)

---
चौकट
पावसामुळे खंड
किशोर गटातील उपांत्यपुर्व फेरीतील रत्नागिरी विरुध्द उस्मानाबाद हा सामना सुरु असतानाच पावसाला सुरवात झाली. रत्नागिरीच्या मुलींनी आक्रमणामध्ये सात मिनिटात ७ गडी बाद केले होते. दुसरा डाव सुरु होत असतानाच मुसळधार पावसाला सुरवात झाली. हा सामना थांबविण्यात आला.