रहाटाघर बसस्थानक झाले चकाचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रहाटाघर बसस्थानक झाले चकाचक
रहाटाघर बसस्थानक झाले चकाचक

रहाटाघर बसस्थानक झाले चकाचक

sakal_logo
By

rat१८p१३.jpg
L५७२३९
रत्नागिरी - पालकमंत्री उदय सामंत यांच्या अचानक भेटीमुळे रहाटाघर बसस्थानकाची तत्काळ स्वच्छता व रस्त्याची दुरूस्ती झाली.
-------------------
रहाटाघर बसस्थानक झाले चकाचक
पालकमंत्री सामंताच्या भेटीचे परिणाम; रत्नागिरी पालिकेचे विशेष सहकार्य
रत्नागिरी, ता. १८ : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रहाटघर एस.टी. बसस्थानकाला दिलेल्या अचानक भेटीचे चांगले परिणाम पुढे आले आहेत. रहाटाघर एस.टी. बस स्थानक आता चकाचक झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिकेच्या विशेष सहकार्यातून बस स्थानकाचा परिसर, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याच्या जागेची स्वच्छता, कर्मचाऱ्यांच्या खोल्या आदींची साफसफाई करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्यामुळे जे. सी. बी. च्या सहाय्याने आगारातील बस पार्किंगच्या ठिकाणी जे खड्डे पडले होते ते भरण्यात आल्याने बसस्थानकाला आता चागला आकार आला आहे. राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत काही दिवसापूर्वीच रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि रहाटाघर बसस्थानकाला अचानक भेटी देऊन झाडाझडती घेतली होती. याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. रहाटाघर एस.टी. बस स्थानकाला सायंकाळी अचानक भेट देऊन बस स्थानक परिसराची पाहणी केली होती. यावेळी प्रसाधनागृहे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या आजुबाजुचा परिसर, खोल्या, आगाराचा आजुबाजुचा परिसर येथे कचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले निदर्शनास आले. त्यामुळे दुर्गंधीही निर्माण झाली होती. प्रवासी वर्गालाही खूप त्रास सहन करावा लागत होता, हे देखील पहाणीत दिसून आले. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बोलावून घेतले. या बस स्थानकाची स्वच्छता तात्काळ करण्याचे आदेश दिले होते.
यावेळी एस.टी. आगाराचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छते बरोबर बसस्थानकात पडलेले खड्डे भरण्याचे कामही हाती घेण्यात आले. जेसीबीने हे काम करण्यात आले. सहकार्य केल्याबद्दल एस.टी.विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पालिकेचे आभार व्यक्त केले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांचा भेटीचा मुख्य उद्देशही यामुळे सफल झाला.
------------------------
चौकट
गेले २ दिवस सफाई
मंत्र्यांच्या आदेशाननंतर गेले २ दिवस रहाटघर एस.टी. बसस्थानकाची एस.टी. सफाई कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व रत्नागिरी पालिकेचे कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. यामुळे आगार आता चकाचक दिसून लागले आहे.