कुडाळात आज व्यापारी बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळात आज
व्यापारी बैठक
कुडाळात आज व्यापारी बैठक

कुडाळात आज व्यापारी बैठक

sakal_logo
By

कुडाळात आज
व्यापारी बैठक
मालवण, ता. १८ : जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ४२ बाजारपेठांतील प्रमुख व्यापारी पदाधिकारी व व्यापारी बांधवांची तातडीची विशेष व्यापक बैठक उद्या (ता. १९) दुपारी साडेतीनला कुडाळ येथील मराठा समाज सभागृह येथे आयोजित केली आहे. बैठकीत संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी आठवडा बाजार आयोजित करण्यासंबंधी विविध तालुका व ग्रामीण व्यापारी संघटनांकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच ऑनलाईन मार्केटिंग कंपन्यांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक व्यापारावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती घेऊन-देऊन यावर करायच्या उपाययोजना निश्चित करण्याबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीस सर्व कार्यकारिणी सदस्य व संबंधित व्यापारी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी केले आहे.