
विनापरवाना मद्य बाळणाऱ्याविरुद्ध गुन्हा
विनापरवाना मद्य बाळणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ता. १८ ः शहरातील खालची आळी येथे एका आईस फॅक्टरीच्या पाठीमागे नारळाच्या बागेत विदेशी गोवा बनावटीची दारु बाळगणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील ४ हजार ५६० रुपयांची विदेशी दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे. मौला कासम शेख (वय ३४, रा. मुरुगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. १७) सायंकाळी साडेचारच्या सुमारास खालची आळी येथील आईस फॅक्टरीच्या पाठीमागे नारळाच्या बागेत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे विनापरवा मद्याच्या विविध प्रकारच्या ४ हजार ५६० रुपये किमंतीच्या बाटल्या मिळाल्या. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रवीण खांबे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार मोहिते करत आहेत.
------
अमली पदार्थ प्रकरणी संशयितास कोठडी
रत्नागिरी ः शहरातील मिरकरवाडा येथे गांजा (अमंली) पदार्थ प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अजय कारेकर (वय २२, रा. पडवेकर कॉलनी, उद्यमनगर रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) रात्री पावणे नऊच्या सुमारास मिरकरवाडा-पांढरा समुद्र येथे निदर्शनास आली होती. पांढरा समुद्र येथे गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत संशयिताकडे १७ हजार ७५० रुपयांचा ७० छोट्या-छोट्या पिशव्यांमध्ये भरलेला अंमली पदार्थ सापडला होता. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन शनिवारीच अटक केली होती. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी (ता. १८) संशयिताला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.