
कशेडी बोगद्यासाठीच्या सामानावर 5 लाखाचा डल्ला
पान १ साठी
कशेडी बोगद्यासाठीच्या
पाईप, सळ्या पळविल्या
---
सात जणांवर गुन्हा; पाच लाख १५ हजारांचा ऐवज
खेड, ता. १८ : तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील महामार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण व कशेडी बोगद्याच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सळ्या, लोखंडी पाईप असा सुमारे पाच लाख १५ हजारांचा ऐवज चोरल्या प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही चोरीची घटना काल (ता. १७) उघड झाली.
श्री निवास विमल मंडळ, विजय नानाजी गेडाम, प्रकाश भावोजी आरके, विलास नामदेव बुरूमकर, श्रीकांत ईश्वर नेताम, अरुण लालजी सिंग, सूरज श्रीराम त्रिपाठी अशी गुन्हा दाखल झालेल्या सात जणांची नावे आहेत. शिंदे इंटरप्रायझेस यांचे कशेडीमधील कशेडी बोगद्याजवळ काम सुरू असून, तेथे उघड्यावर ठेवलेले साहित्य संशयितांनी एकमेकांच्या संगनमताने टेम्पो (एमएच ४८ बीएमएम ०९६३)मधून चोरल्या प्रकरणी परमेश्वर पुंडलिक उबाळे (रा. कोरवली, सोलापूर, सध्या रा. सोळजाई सायली ढाब्याच्या शेजारी, पोलादपूर, जि. रायगड) यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सात जणांवर येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलिस अधिक तपास करीत आहेत.