
‘मलये परिवर्तन’ पॅनलचे सर्वपक्षीयांसमोर आव्हान
57265
मालवण ः तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना (कै.) सुनील मलये यांच्या पॅनलचे उमेदवार.
‘मलये परिवर्तन’ पॅनलचे
सर्वपक्षीयांसमोर आव्हान
मालवण खरेदी-विक्री संघ निवडणूक
मालवण, ता. १८ : तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (कै.) सुनील मलये परिवर्तन पॅनलने उडी घेतली आहे. व्यक्ती सदस्य मतदार संघातून ९ जागांवर आपले उमेदवार उभे करत सर्वपक्षीयांसमोर आव्हान उभे केले आहे. या निवडणुकीत आमचे सर्व उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास (कै.) सुनील मलये परिवर्तन पॅनलने व्यक्त केला आहे.
तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत (कै.) सुनील मलये परिवर्तन पॅनलने उडी घेतली आहे. व्यक्ती सदस्य मतदार संघातून ९ उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये ज्ञानदेव ढोलम, राजन भोजणे, गोविंद (अमित) गावडे, कृष्णा ढोलम, महेश गावकर, मनाली चव्हाण, संतोष चव्हाण, मनवा गावकर, यशवंत पराडकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. (कै.) सुनील मलये, अमित गावडे यांनी खरेदी विक्री संघाच्या कारभारावर आणि संघाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायावर वेळोवेळी आवाज उठवला होता. कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत कोर्टात न्यायालयीन लढा देत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला होता. त्यामुळे सुनील मलये यांचे स्वप्न पूर्ण करणार असून या निवडणुकीत सर्व उमेदवार विजयी होतील, असा विश्वास मलये परिवर्तन पॅनलने व्यक्त केला आहे.