वेरवली बुद्रुकमध्ये विजयाचे शिल्पकार रवींद्र डोळस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेरवली बुद्रुकमध्ये विजयाचे शिल्पकार रवींद्र डोळस
वेरवली बुद्रुकमध्ये विजयाचे शिल्पकार रवींद्र डोळस

वेरवली बुद्रुकमध्ये विजयाचे शिल्पकार रवींद्र डोळस

sakal_logo
By

वेरवली बुद्रुकमध्ये सरपंचासह
शिवसेनेच सहा सदस्य विजयी
लांजा, ता. १८ : लक्षवेधी ठरलेल्या वेरवली बुद्रुक ग्रामपंचायतीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचा भगवा फडकला. सर्व विरोधकांनी एकत्र येत उद्धव ठाकरे शिवसेना गटाला कोंडीत पकडण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडत शिवसेनेचे विभाग संघटक रवींद्र डोळस यांनी अखेर वेरवली बुद्रुक ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचा भगवा फडकवला आहे. सरपंच पदासह शिवसेनेचे सहा सदस्य निवडून आले आहेत.
वेरवली ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली होती. या ठिकाणी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला होता. सर्व विरोधकांनी एकत्र येत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अशा परिस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विभाग संघटक रवींद्र डोळस यांनी करिश्मा करत पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या वेदा कोळवणकर या सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्याचप्रमाणे एकूण नऊ सदस्यांपैकी मोहन जाधव, विमल जाधव, शुभ्रा करळकर, दीपक पवार ,महेंद्र डोळस आणि दीक्षा गुरव हे सहा सदस्य शिवसेनेने निवडून आणले आहेत. विजयानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत, फटाके फटाके वाजवून आणि रवींद्र डोळस यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.