अध्यक्षपदी उद्योजक मुकेश गुप्ता यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्षपदी उद्योजक मुकेश गुप्ता यांची निवड
अध्यक्षपदी उद्योजक मुकेश गुप्ता यांची निवड

अध्यक्षपदी उद्योजक मुकेश गुप्ता यांची निवड

sakal_logo
By

rat21p3.jpg
57847
रत्नागिरी : भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुकेश गुप्ता यांचे अभिनंदन करताना जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन. सोबत गणेशगुळे गावचे सरपंच संदीप शिंदे आणि प्रज्योत गुळेकर.
-----------
भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या
अध्यक्षपदी गुप्ता यांची निवड
रत्नागिरी, ता. २१ : येथील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक मुकेश गुप्ता यांच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी मुकेश गुप्ता यांची दक्षिण रत्नागिरी भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. याबद्दल छठ पूजा समिती, रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी, राममंदिर संस्था, मंगलमुर्ती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री. गुप्ता यांचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक संस्थामध्ये चांगले काम असून या निवडीमुळे त्यांना मोठ्या कार्यक्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे. उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्राचे महामंत्री प्रद्युम्न शुक्ला व प्रवक्ता विनोद उपाध्यक्ष यांनी मुकेश गुप्ता यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात राहत असलेल्या उत्तर भारतीय/हिंदी भाषिक नागरिकांना नूतन अध्यक्ष मुकेश गुप्ता यांनी आवाहन केले की उत्तर भारतीय मोर्चा रत्नागिरी जिल्हा व तालुका कार्यकारिणीत काम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. ज्यांना या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक सेवेची कामे करायची आहेत, अशा व्यक्तींनी संपर्क साधून माहिती द्यावी.