परुळे आरोग्य केंद्राला डॉक्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परुळे आरोग्य केंद्राला डॉक्टर
परुळे आरोग्य केंद्राला डॉक्टर

परुळे आरोग्य केंद्राला डॉक्टर

sakal_logo
By

57884
परुळे ः येथील आरोग्य केंद्रात डॉ. कृतिका जाधव यांचे स्वागत करताना संबंधित.

परुळे आरोग्य केंद्राला डॉक्टर
सावंतवाडी ः परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी जागेवर आरोग्य अधिकारी नेमण्याची मागणी सचिन देसाई आणि कोचरा, म्हापण, परुळे, चीपी, कुशेवाडा भोगवे, मेढा, केळु्स भागातील सरपंच लोकप्रतिनिधी यांनी सुमारे दीड महिन्यापूर्वी मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार शिक्षण मंत्री केसरकर यांनी तात्काळ दाखल घेत आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे लक्ष वेधले होते. यानंतर परुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नियुक्ती करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले होते. त्यानुसार या आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉ. कृतिका जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र परुळेत स्वागत करण्यात आले. यावेळी सचिन देसाई, निलेश तेली, उमाकांत परब, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
------------
57883
डॉ. मनाली पटवारी, डॉ. श्वेता जगताप, डॉ. स्पृहा गोगटे, डॉ. माहेश्वरी कामत

फिजिओथेरपिस्ट असोसिएनची स्थापना
कुडाळ ः जिल्ह्यात इंडियन असोसिशन ऑफ फिजिओथेरपिस्टची स्थापना नुकतीच झाली असून कार्यकारिणीच्या अध्यक्षपदावर डॉ. मनाली पटवारी (सावंतवाडी), सचिव डॉ. श्वेता जगताप (कणकवली), कोषाध्यक्ष डॉ. स्पृहा गोगटे (देवगड) कार्यकारिणी सदस्य डॉ. माहेश्वरी कामत (कुडाळ) यांची निवड झाली आहे. फिजिओथेरपी उपचार पद्धतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही उपचार पद्धती पोहोचवण्यासाठी आयएपी सिंधुदुर्गची टीम जिल्हयात फिजिओथेरपीची शिबीरे घेऊन काम करणार आहे. अस्थि विकार, मेंदूविकार, अपंगत्व, फुफ्फुसांचे आजार यामध्ये फिजिओथेरपीचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच लोकांनी या उपचार पद्धतीबद्दल माहिती घेऊन, ओटी, पीटी कॉन्सील महाराष्ट्र तसेच आयएपीचे रजिस्ट्रेशन असलेल्या फिजिओथेरपीस्टकडूनच उपचार करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
-------------
मळेवाडला नरकासुर स्पर्धा
सावंतवाडी ः मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीच्यावतीने रविवारी (ता.२३) नरकासूर व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा प्रारंभ माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते तर युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धा गाव मर्यादित घेतल्या जाणार आहेत. नरकासुर स्पर्धेसाठी नरकासुराची उंची कमीत कमी आठ फूट असावी तर आकाश कंदील हा पर्यावरण पूरक असावा. नरकासुर स्पर्धा प्रथम ५०००, द्वितीय ३०००, तृतीय १५०० तर आकाश कंदील स्पर्धा प्रथम १५००, द्वितीय १०००, तृतीय ५०० रुपये तसेच दोन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला चषक अशी बक्षिसे आहेत.
---
चिन्मय राणे यांची नियुक्ती
कणकवली ः शिवराज्य ब्रिगेडच्या कणकवली तालुकाध्यक्षपदी फोंडाघाट येथील चिन्मय राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच्या नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष सुनील पारकर यांनी त्यांना प्रदान केले. यावेळी शेखर राणे, भास्कर, राणे, उल्हास तांडेल, संदेश पटेल, दिलीप घाडीगावकर, दीपक राऊत, अनिल खोचरे आदी उपस्थित होते. आपण सामाजिक क्षेत्रात वेळ, श्रम, पैसा व बुद्धिकौशल्य देऊन सातत्याने अग्रेसर राहून काम करत आहात. संघटना मजबूत व्हावी, यासाठी ही नियुक्ती केल्याचे या पत्रात म्हटले आहे.
---