उत्कृष्ट ग्रामसंघांचा सावंतवाडीत गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्कृष्ट ग्रामसंघांचा सावंतवाडीत गौरव
उत्कृष्ट ग्रामसंघांचा सावंतवाडीत गौरव

उत्कृष्ट ग्रामसंघांचा सावंतवाडीत गौरव

sakal_logo
By

57886
सावंतवाडी ः माजगाव येथील सिध्दीविनायक सभागृहात शिवम प्रभाग संघाच्या वार्षिक सभेत उपस्थित महिला वर्ग व इतर.


उत्कृष्ट ग्रामसंघांचा सावंतवाडीत गौरव

माजगाव शिवम प्रभागसंघाची सभा उत्साहात


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः माजगाव येथील शिवम प्रभागसंघाची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच माजगाव येथील सिद्धीविनायक सभागृहात उत्साहात पार पडली.
या सभेचे उद्धाटन बँक ऑफ इंडिया आरसेटीचे चेतन पाटकर, उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक प्रदीप ठाकरे, प्रभागसंघ अध्यक्ष शमिका नाईक, सचिव विशाखा सावंत, कोषाध्यक्ष सपना गावडे, माजगाव सरपंच दिनेश सावंत, सरमळे सरपंच सावंत, माजी पंचायत समिती सभापती रमेश गावकर, ओटवणे माजी सरपंच म्हापसेकर, स्वाती रेडकर, गवंडे, प्रभाग समन्वयक श्रीमती. भंडारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी तीन उत्कृष्ट ग्रामसंघ, तीन उत्कृष्ट समूह व चार उत्कृष्ट उत्पादक गट यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट ग्रामसंघ ः श्री कलेश्वर ग्रामसंघ (वेत्ये), सावली ग्रामसंघ (माजगाव), ओमसाई ग्रामसंघ (चराठा). उत्कृष्ट समूह ः विनायक महिला समूह (सोनुर्ली), प्रसन्ना महिला समूह (ओटवणे), सिद्धिविनायक महिला समूह (माजगाव). उत्कृष्ट उत्पादक गट ः वसुंधरा उत्पादक गट (सरमळे), कलाकौशल्य उत्पादक गट (माजगाव), अनमोल उत्पादक गट (वेत्ये), कोकणरत्न उत्पादक गट (माजगाव).
यावेळी श्री पाटकर यांनी शाश्वत उपजीविका निर्माण करण्यासाठी कुक्कुटपालन, शेती व इतर व्यवसाय उभे करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आपल्या भाषणातून विषद केली. तालुका अभियान व्यवस्थापक ठाकरे यांनी शाश्वत उपजीविका उभारणीसाठी उमेदमार्फत चालू असणाऱ्या योजनांची माहिती दिली. प्रभागसंघ लिपिका वैशाली गवस यांनी २०२१-२२ चा आर्थिक ताळेबंद व २०२२-२३चे अंदाजपत्रक मांडले. या बैठकीला सर्व ग्रामसंघातील महिला, सर्व प्रभाग समन्वयक उपस्थित होते. सभा व्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रभागसंघ पदाधिकारी, सर्व ग्रामसंघाचे पदधिकारी, सर्व सीआरपी, लिपिक्स, इतर सर्व केडर व प्रभाग समन्वयक श्रीमती भंडारी यांनी विशेष मेहनत घेतली.