रत्नागिरी-जलजीवन मिशनचा केंद्रीय समितीकडून आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-जलजीवन मिशनचा केंद्रीय समितीकडून आढावा
रत्नागिरी-जलजीवन मिशनचा केंद्रीय समितीकडून आढावा

रत्नागिरी-जलजीवन मिशनचा केंद्रीय समितीकडून आढावा

sakal_logo
By

जलजीवन मिशनचा
केंद्रीय समितीकडून आढावा
रत्नागिरी ः केंद्रिय जलशक्ती मंत्रालयातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजिवन मिशन अभियानाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती येऊन गेली. जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील कोंढवी, नवेट, साखरतर, केळ्ये, वाडादून, संदखोल, जयगड, चरवेली, मजगाव, शिरगाव, गुहागर तालुक्यातील पिंपळवट, खोडदे, आबलोली, चिपळूण तालुक्यातील केरे, कातळवाडी, पालवणी तर्फे वेळंब या गावांना या पथकाने भेटी दिल्या. जलजिवन मिशन कार्यक्रमांतर्गत निर्माण करण्यात आलेल्या उपाययोजना, घेण्यात आलेले उपक्रम, गावातील लोकांना देण्यात आलेली वैयक्तीक नळ जोडणी याची पाहणी, तपासणी यावेळी करण्यात आली. या समितीत डॉ.अग्रवाल व श्री. बसेर यांचा समावेश होता. यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.