संगमेश्वर-विद्यार्थी रमले आकाशकंदील, किल्ले उभाण्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर-विद्यार्थी रमले आकाशकंदील, किल्ले उभाण्यात
संगमेश्वर-विद्यार्थी रमले आकाशकंदील, किल्ले उभाण्यात

संगमेश्वर-विद्यार्थी रमले आकाशकंदील, किल्ले उभाण्यात

sakal_logo
By

rat२१p७.jpg
५७८६४
संगमेश्वरः दिवाळीनिमित्त विद्यार्थी, विद्यार्थिनींनी शाळेत रांगोळी काढली.
rat२१p८.jpg
L५७८६५
पैसाफंड हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेला किल्ला.
-------
विद्यार्थी रमले आकाशकंदील, किल्ले उभाण्यात
पैसाफंडमध्ये उपक्रम ; ३०० हून अधिक कंदील केले तयार
संगमेश्वर, ता. २१ ः प्रथम सत्राची परीक्षा झाली की, मुलांना वेध लागतात ते दीपावलीच्या सुट्टीचे. सध्याचा जमाना हा तयार वस्तू घेण्याचा असल्याने मुलांना आकाशकंदील तयार करणे, किल्ल्यांची वैविध्यपूर्ण उभारणी करणे अशा जुन्या परंपरा काहीशा विस्मरणात गेल्या असल्याने परीक्षा झाल्यानंतर लगेचच दोन दिवस संगमेश्वर येथील पैसाफंड इंग्लिश स्कूलमधील सारे विद्यार्थी किल्ले, आकाशकंदील आणि रांगोळी घालण्यात रमले होते. गत दोन दिवसात विद्यार्थ्यांनी आपल्यातील आगळावेगळा कलाविष्कार सादर करून मनमुराद आनंद लुटला.
संगमेश्वर येथील व्यापारी पैसाफंड संस्थेच्या पैसाफंड इंग्लिश स्कूलने यावर्षी दिवाळी सुट्टीपूर्वी दोन दिवस शाळेच्या परिसरातच किल्ले बनवणे, विविध प्रकारचे आणि आकारांचे आकाशकंदील तयार करणे याचबरोबर सुंदर रांगोळ्या घालण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. पाचवीतील मुलांपासून दहावीपर्यंतची मुले या कामात अशी काही मग्न झाली की, त्यातून विद्यार्थ्यांमधील आगळ्यावेगळ्या कलेचा आविष्कार पाहायला मिळाला.
मुलांचे चिमुकले हात दगड आणण्यात, माती कालवण्यात, कागदकाम करण्यात कमालीचे व्यस्त झाले. कोणाच्या गालाला माती लागत होती तर कोणाच्या कपड्यांना मात्र या कशाचीही तमा न करता मुलांनी आपले लक्ष्य केंद्रित केले होते ते आपल्या कलाविष्कारावर. पाचवी ते दहावीच्या मुलांनी जवळपास ३०० पेक्षा अधिक आकाशकंदील शाळेत तयार केले. हे सारे कंदील शाळेच्या दर्शनी भागाला लावून व्यापारी पैसाफंड संस्थेने शाळेच्या इमारतीला विद्युत रोषणाई केली असल्याने महामार्गावरून जाणारे वाहनचालक, स्थानिक ग्रामस्थ, पालक हा सुंदर आणि नेत्रदीपक नजारा पाहून विद्यार्थ्यांच्या कलेसह या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. मुलांनी एकत्र येऊन सहा किल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती तयार केल्या. प्रशालेतील मुलींनी एकत्र येत ३० पेक्षा अधिक नेत्रदीपक अशा रांगोळ्या घातल्या. संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, सर्व वर्गशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन करून कौतुक केले आहे.

चौकट
मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न
व्यापारी पैसाफंड संस्थेने अभ्यासाबरोबरच मुलांच्या कलाविष्काराला प्राधान्य देण्यासाठी तसेच मुलांचा मोबाईलकडे वाढत असलेला कल पालकांना त्रासदायक ठरतो. त्यामुळे दीपावली सुट्टीपूर्वी सलग दोन दिवस विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला प्राधान्य देता यावे म्हणून किल्ले तयार करणे, आकाशकंदील बनवणे आणि रांगोळ्या घालणे असा उपक्रम राबवला असल्याचे संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी सांगितले. प्रशालेत मोबाईल आणायला सक्त बंदी असून मोबाईल आणि सोशल मीडियाचा अति वापर केल्याने होणाऱ्या तोट्यांबाबत प्रशालेत प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे धनंजय शेट्ये यांनी नमूद केले.